Subscribe Us

दुकानात मारहाण व्हिडिओ व्हायरल, परस्पराविरोधी तक्रारी दाखल.


तेरणेचा छावा/धाराशिव:-
 धाराशिव येथील एका दुकानात गुरुवार( दि. 30 ऑक्टोबर) रोजी झालेल्या मारहाण प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या चर्चेला उधाण आलो होते.परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आलेले असून एकूण पाच जणाविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आलेले आहेत. शुक्रवार( दि. 31ऑक्टोबर) रोजी विजय राठोड, आकाश तावडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली तर शनिवार (दि.1 सप्टेंबर) रोजी विजय राठोड यांच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक रोहित निंबाळकर, मंगेश भुजबळ व पृथ्वीराज पाटील यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.
      यावेळी विजय राठोड यांनी त्यांच्या जबाबात सांगितले की   दिनांक 30/10/2025 रोजी रात्री नऊ वाजणेच्या सुमारास मला आमचे गल्लीतील पृथ्वीराज रामदास पाटील रा.भानुनगर धाराशिव याला त्याचे दुकान शिवशक्ती एंट्र‌प्रायजेस येथे जाऊन माझे पत्नी हिची छेड का काढली असे विचारले तसेच तेथे तो इतर लोकांना घेऊन बसला होता म्हणुन माझा राग अनावर झाला त्यामुळे आमचेत वाद झाला तेथे असलेले रोहित शशीकांत निंबाळकर व मंगेश भुजबळ यांना माझे सोबत वाद करुन रोहित निंबाळकर याने शिवीगाळ करुन ॲल्युमिनियम चे पट्टीने मला मारत असताना माझे उजवे हाताचे अंगठ्याजवळील बोटाला जखम होऊन रक्त निघाले व माझे डावे मनगटावर व कोपरावर पट्टीने मारुन दुखापत केली त्याच वेळी मंगेश भुजबळ यानेपण ॲल्युमिनियमचे पट्टीने माझे डोक्यात डावे बाजुस मारुन दुखापत केली त्यावेळी तेथे असलेले सुरेश पवार याने आमचे भांडण सोडवत होता. त्यांचे तावडीतुन सुटत मी बाहेर आलो. बाहेरपण मला ते मारत होते. गल्लीतील लोक जमा झाले ते बघुन घेतो व जिवे मारतो अशी धमकी देऊन ते तेथून निघुन गेले. तसेच जाता जाता मला व आकाश तावडे यांना दहा ते पंधरा दिवसात जिवे मारतो अशी धमकी दिली माझे डोक्यातुन रक्तस्राव व हातातून रक्तस्राव होत असलेने माजे मित्र शांताराम लोंडे, संदेश जाधव व बबलु गाढवे तसेच माझा भाऊ अरुण राठोड यांनी मला लाईफ लाईन हॉस्पीटल धाराशिव येथे उपचारकामी घेऊन आले. डॉक्टरांनी तपासुन मला ॲडमीट करुन घेतले. सध्या
माझे वर उपचार चालु असुन मी पुर्णपणे शुद्धीवर आहे. तरी मला मारहाण करणारे वरील लोकांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी ही विनंती. अशा प्रकारची तक्रार आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास आनंदनगर पोलीस स्टेशन करत आहे.

Post a Comment

0 Comments