Subscribe Us

समाधान बाराते यांचे नदीपात्रातील आमरण उपोषण आ.कैलास पाटलांच्या आश्वासनानंतर मागे.


तेरणेचा छावा/दहिफळ:-
      दहिफळ येथून जवळच असलेल्या कळंब तालुक्यातील संजीतपूर येथील समाधान बाराते यांनी गावातून जाणाऱ्या तेरणा नदीवरील पुलाची उंची वाढवावी या मागणीसाठी शुक्रवार (दि.३१ ऑक्टोबर)पासून आमरण उपोषण सुरू केले होते.
  तेरणा नदीला पूर आला की संजीतपुर गावाचा संपर्क तुटतो त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या गैरसोयींना सामना करावा लागतो. या ग्रामस्थांच्या मागणीला घेऊन समाधान बाराते यांनी आमरण उपोषण चालू केले होते.
    आ.कैलास पाटील यांनी 1 नोव्हेंबर रोजी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणाला भेट देत उपोषण स्थळी समाधान बाराते यांची भेट घेतली. गावकऱ्यांच्या सुरक्षेच्या आणि सुविधेच्या दृष्टीने पुलाची उंची वाढविणे अत्यावश्यक असल्याने, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात येईल असे आश्वासन दिले..
    या सकारात्मक आश्वासनानंतर पाणी पिऊन उपोषण स्थगित केले.यावेळी येरमाळा येथील शिवसेना विभाग प्रमुख राहुल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती शिवाजी बाराते सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments