तेरणेचा छावा/धाराशिव:-
संजीतपुर येथील तेरणा नदी पात्रातील पुलाची उंची वाढवावी. या मागणीसाठी युवा नेते समाधान बाराते यांनी शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी तेरणा नदीपात्रात आमरण उपोषण करण्यात असल्याचे पत्र जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील संजीतपुर येथील तेरणा नदीवर 27 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल आहे. त्या पुलाची उंची अवधी पाच फूट आहे. कमी उंची असल्याने पावसाळ्यात संजीतपुरचा संपर्क अनेक वेळा तुटतो. यावर्षी मराठवाडा स्वातंत्र्यसंग्राम दिनाला नदीला आलेल्या पुरामुळे झेंडावंद करण्यासाठी शिक्षकांना गावात येता आलं नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दवाखाना, शाळा शेतकरी सर्वच लोक या कमी उंचीच्या पुलामुळे त्रस्त आहेत. गावात कुणाच्या घरात इमर्जन्सी तयार झाली तर अनेक वेळा गावा बाहेर पडता येत नाही. गावातील शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना देखील अनेक वेळा गावात पोहोचता येत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. गेल्या 10 वर्षांपासून गावकरी सातत्याने त्याबाबत पाठपुरावा करत आहेत मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नाईलाज झाल्याने शुक्रवार (दि. 31 ऑक्टोबर) रोजी संजीतपुर येथील तेरणा नदी पात्रात आमरण उपोषणाला बसत असून जोपर्यत नदीवरील पुलाच्या कामासाठी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण कायम राहील. अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे.
या निवेदनाचे पत्र
मा.प्रताप सरनाईक पालकमंत्री धाराशिव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव,जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा पोलिस अधिक्षक, या सर्व कार्यालयाच्या जिल्ह्यातील मुख्य कार्यालयाकडे माहितीस्तव देण्यात आलेल्या आहेत.
अशाप्रकारे आपल्या गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी युवकांना आमरण उपोषण चालू केल्यामुळे ग्रामस्थातून व परिसरातून या उपोषणाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे.
0 Comments