Subscribe Us

निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवाद लाटण्यासाठी थयथयाट कशाला? शिवसेनेचे धाराशिवचे शहरप्रमुख आकाश कोकाटे यांचा 140 कोटीचे श्रेय घेणाऱ्यांना थेट इशारा.



तेरणेचा छावा/धाराशिव:-
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख भाई एकनाथजी शिंदे यांच्याकडे तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे धाराशिव नगर परिषदेला पहिल्यांदाच भरघोस 140 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीमधून शहरातील 59 रस्ते व इतर कामांना खोडा घालण्याचा प्रयत्न करणार्‍या मंडळींनी मंत्री महोदयांचे आभार मानायला पाहिजे होते.
      परंतु निधी कोणी मंजूर केला आणि कोणी मंजूर करवून आणला याचे भान स्वार्थाचे राजकारण आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे महापाप करणार्‍यांना राहिलेले नाही. म्हणून ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर थयथयाट करणार्‍यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख भाई एकनाथजी शिंदे, तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि निधीचा दुरूपयोग करणार्‍यावर नियमाचा बडगा उगारणारे विद्यमान पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांचे आभार मानायचे सोडून ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर थयथयाट सुरू केला आहे. पण श्रेयवादासाठी राजकीय पक्षाच्या व त्यांच्या इतर त्यांच्या बगलबच्चांना जनता यावेळेस माफ करणार नाही याचे भान त्यांनी बाळगावे, अन्यथा नगर परिषद निवडणुकीत तुम्हाला एकही जागा पदरी पडणार नाही.
      धाराशिव शहरातील नागरिकांची रस्त्यांची गैरसोय लक्षात घेवून विविध भागातील 59 रस्त्यांच्या कामांसाठी 140 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात यावा तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री भाई एकनाथजी शिंदे आणि पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे सतत  पाठपुरावा केला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री भाई एकनाथजी शिंदे यांनी तब्बल 140 कोटी रूपयांचा निधी धाराशिव नगर परिषदेकरिता मंजूर केला. म्हणून काही राजकीय मंडळींनी निधीचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
    मात्र निधी कोणी खेचून आणला याचे भान मात्र त्या नेत्यांना राहिले नाही. केवळ बॅनरबाजी करून राजकारण चालत नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या विचारावर आजही शिवसेना टिकून आहे, हे बॅनर बाजी करणाऱ्यानी लक्षात ठेवले पाहिजे. 
     धाराशिव शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था करून ठेवलेले उबाठाचे खासदार, आमदार आणि तत्कालीन नगराध्यक्ष 140 कोटीच्या निधीवर देखील डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा आपल्या धाराशिवचे विद्यमान कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांनी सदरील निविदा ही चुकीच्या पद्धतीने केली आहे नियमांचा भंग करून केली आहे

काही राजकीय मंडळींच्या लाडक्या गुत्तदाराला सदर 140 कोटी चे काम मिळावे यासाठी अत्यंत टोकाचे प्रयत्न केले आहेत.
      तरी देखील ‘गिरे भी तो टांग ऊपर’  या उक्तीप्रमाणे आम्हीच हा निधी मिळवून आणला आणि शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आमच्यामुळेच होणार असा डांगोरा पिटण्याचे काम काही लोकप्रतिनिधी करू लागले आहेत. त्यांना येत्या निवडणुकीत चिखल आणि धुरळ्यात जगणारे धाराशिवकर उताणे पाडल्याशिवाय राहणार नाहीत.
       धाराशिव शहरवासियांना भुयारी गटार योजनेची गरज नसताना शहरातील सर्व रस्त्यांचे खोदकाम करून निधीचा धुरळा उडविला. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुरळा सोसत धाराशिवकर खड्डयांमधून आजही वाट काढत आहेत. परंतु जनतेच्या समस्येऐवजी आपला स्वार्थ साधणार्‍या लोकांनी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगर परिषदेची सत्ता हडपण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही निवडणूक यावेळेस इतकी सहज-सोपी नाही हे त्यांच्या लक्षात आलेली नाही. म्हणून ऐनवेळी निधी आम्हीच आणला अशा वल्गना करणार्‍या आणि इतके दिवस झोपा काढणार्‍यांना एवढेच सांगणे आहे की जर तुमच्यात हिंमत होती तर धाराशिव शहराचा विकास का झाला नाही? विकासाचे श्रेय घेण्यासाठी पुढे या, पण तुम्ही काय दिवे लावले ते आधी जनतेला सांगा आणि मगच जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्या. 
     जनतेने एकदा विश्वास ठेवला म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीप्रमाणे उगीच काहीही बरळू नये. धाराशिव शहराचा खरेच विकास करायचा होता तर धाराशिव शहरवासियांना खड्डयांच्या खाईत कोण लोटले? स्वच्छतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी लाटून जनतेला दुर्गंधीत कोण ढकलले? अंतर्गत रस्त्यांवर भुयारी गटार योजनेच्या नावाखाली रस्ते उकरून लोकांचा बळी घेणारे एकदा तरी लाजले का? स्वतःचे पाप झाकण्यासाठी बगलबच्चांना पुढे करुन आंदोलनाची नौटंकी करणार्‍यांना अजुनही लाज वाटत नाही का? पिण्याच्या पाण्याचीही बोंब असताना केवळ निधीच्या श्रेयवादावरून प्रत्येकवेळी थयथयाट कशाला? धाराशिवकर जनता सूज्ञ आहे. तुमची नौटंकी जाणून आहे. म्हणून यापुढील काळात निधी कोणी आणला, कोणी दिला यावर भाष्य करण्यापेक्षा जनतेसमोर सत्य मांडा. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जनतेची माथी भडकविण्यापेक्षा स्वतः आपण कोणत्या पायरीवर आहोत याचे भान ठेवा आणि मगच राजकारण खेळा. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या विचारांवर आजचा महाराष्ट्र वाटचाल करतोय. त्याला स्वार्थासाठी खीळ घालण्यापेक्षा स्वतः या मार्गावर या, तरच तुम्हाला राजकारण आणि समाजकारणाचा फरक कळेल आणि धाराशिवच्या विकासात योगदान द्यायचे नसेल तर आडकाठी आणू नका, एवढेच तुम्हाला सांगणे आहे.

Post a Comment

0 Comments