Subscribe Us

कुणबी,मराठा - कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत




तेरणेचा छावा/धाराशिव:-  महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.या समित्यांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश आहे.शासन निर्णयानुसार अर्जदाराने तहसील कार्यालयात जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना खालील पुरावे सादर करणे आवश्यक आहे.
     अर्जदार हा मराठा समाजातील भूधारक, भूमिहीन,शेतमजूर किंवा बटाईदार म्हणून जमीन शेती करत असल्याचा पुरावा.वडील व आजोबा पूर्वीचे रहिवासी असल्याचे प्रतिज्ञापत्र,१३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचे स्थानिक दाखले.अर्जदाराच्या गावातील/कुळातील नातेवाईकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाल्याचा दाखला व अन्य आवश्यक पुरावे.तहसीलदार यांच्याकडे अर्ज सादर केल्यानंतर संबंधित समिती चौकशी करून अहवाल सादर करेल. 
    ग्रामपातळीवरील समिती गावातील ज्येष्ठ नागरिक,पोलिस पाटील आदींची मदत घेऊन पडताळणी करेल.त्यानंतर तहसीलस्तरीय समिती अंतिम निर्णय घेईल.शासनाच्या या निर्णयामुळे संबंधित नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.
             

Post a Comment

0 Comments