Subscribe Us

ताडपत्री फाडून माल लंपास,येरमाळा ते चोराखळी हायवे दरम्यानची घटना.


                                                               संग्रहचित्र
तेरणेचा छावा/येरमाळा:- 
येरमाळा नजीक हायवेवर  चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसून येत आहे. तसेच सोमवार (दि.8 सप्टेंबर) रोजी हायवेवर येरमाळा तेरखेडा दरम्यान सकाळी 07:00 वाजता ट्रक वर चढून चोरी करीत असल्याची घटना उघडकीस आल्यामुळे आता तर दिवसाही हायवे सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
    याविषयी सविस्तर वृत्त असे की किरण अर्जुन पाटील, वय 24 वर्षे, रा.रोहीलागड ता. अंबड जि. जालना यांचे पिकअप  क्र एमएच 20 जीझेड  2946  मधील तीन कॅरेट  रॉयल  इनफिल्ड  कंपनीचे पार्ट 30 नग  असा  एकुण 36,000₹ किंमतीचा माल हा रविवार (दि.07 सप्टेंबर) रोजी रात्री 10.00 ते 10.30 वा. सु.येरमाळा ब्रिज ते  चोराखळी येथील एच पी पेट्रोल पंपा दरम्यान अज्ञात व्यक्तीने पिकअप वरील ताडपत्री फाडून चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-किरण पाटील यांनी दि.08.09.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
     त्यामुळे या हायवे वरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण असून मालवाहतूक वाहनधारक दुसरा मार्ग शोधण्याच्या मार्ग अवलंबण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. अशा घटनांमुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेसमोर चोरट्यांनी चॅलेंज दिल्याप्रमाणे रोडरॉबडी करून चोरी करत असल्यामुळे पोलीस यंत्रणेकडे लोक संशयाने बघताना दिसून येत आहेत व लोक असे बोलूनही दाखवत आहेत.

Post a Comment

0 Comments