Subscribe Us

पालकमंत्री प्रताप सरनाईक 2 दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर.


तेरणेचा छावा/धाराशिव:-
 परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक  16 व 17 सप्टेंबर दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यात शासकीय कार्यक्रम,उद्घाटन, बैठका,भूमिपूजन अशा भरगच्च  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  
   मंगळवार (दि.16 सप्टेंबर )रोजी  सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांसमवेत सोलापूर जिल्ह्यातील विविध विषयांवर बैठक होईल. दुपारी १:१५ वाजता ते तूळजापूर, जि. धाराशिव येथे रवाना होतील आणि दुपारी २:१५ वाजता तुळजाभवानी मंदिर, तूळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ च्या तयारीची पाहणी आणि आढावा बैठक घेतील. यावेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी उपस्थित राहतील. सायंकाळी ५:३० वाजता ते धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील आणि सायंकाळी ६ वाजता धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील. रात्री ९ वाजता याच ठिकाणी मुक्काम करतील.
      बुधवार(दि. १७ सप्टेंबर )रोजी सकाळी ८:२५ वाजता मा. सरनाईक शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. सकाळी ८:४५ वाजता ते “मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिन” समारंभाला उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे “उम्मीद निदान केंद्र” आणि “रक्त साठवण केंद्र” यांचे उद्घाटन करतील. यावेळी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र द. चौहान (मो. ७५८८६९३०३२) उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे “४५ मीटर ध्वज” उभारणी कार्यक्रमाचे भूमिपूजन करतील. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (मो. ९६०४३४६४६१) उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता ते धाराशिव येथून समृद्धी महामार्गामार्फत (धाराशिव-छत्रपती संभाजीनगर-नाशिक-ठाणे) ठाणे येथील निवासस्थानाकडे रवाना होतील. 
       अशाप्रकारे विविध कार्यक्रमाने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याचे नियोजन केलेले असून जिल्हा नियोजन निधी संदर्भात काही निर्णय होतो की नाही या यामुळे धाराशिव जिल्हावाशीयांचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments