तेरणेचा छावा/येरमाळा:-
येथील प्रसिद्ध देवस्थान श्री.येडेश्वरी देवीची शनिवारी नारळी पौर्णिमा यात्रा मोठया उत्साहात पार पडली.देवीच्या पालखीची दहीहंडीसह निघालेल्या गाव प्रदक्षिणेत भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागतून,मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी पंचक्रोशीतून लाखोंच्याच्या संख्येने गर्दी केली होती.नारळी पौर्णिमा पारंपरिक दहीहांडी फोडण्याचा कार्यक्रम दु ४ वा. श्री. महाराज यांच्या हस्ते पार पडला.
श्री येडेश्वरी देवीच्या वर्षातून भरणाऱ्या दोन यात्रे पैकी नारळी पोर्णिमा ही दुसरी मोठी यात्रा मनाली जाते.मंगळागौर विसर्जनाच्या नंतर आनंदधाम विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित हरिनाम सप्ताहाने होते.पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या मंदिरात देवीची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी दाखल होते.पोर्णिमे दिवशी गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविक देवीच्या पालखीला पुरणपोळीचा नेवैद्य दाखवुन दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.सकाळी ११ वा.पालखी विठ्ठल रुक्मिनी मंदिराच्या पाठीमागून गावप्रदक्षिणा घेत,हिंदू चौक,रोकडेश्वर मारुती मंदिर चौकातून गावावकुसाच्या बऱ्याच्या बालाजी,दत्तात्रय रमेश बारकुल यांच्या सोयाबीन पिकाच्या शेतातून जुन्या कवड्याच्या आंब्याजवळून येडेश्वरी मंदिर मार्गावरून गावाला वळसा घालुन विसावा मंदिराजवळ विसावा घेऊन मंदिराकडे दहीहंडीसह आराधी मंडळाच्या ढोलकी,जहांज, तुणतुणे,संभळाच्या तर भजनी मंडळाच्या टाळ, मृदंगच्या गजरात वाजत गाजत डोंगरावर मंदिराच्या परिसरात आली येथील पारंपरिक चिंचेच्या झाडावर दहीहंडी फोडण्याचा मानाप्रमाणे दु ४ वा. महाराज यांच्या हस्ते व देवीचे मानकरी अमोल पाटील,यशवंत पाटील यांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्यात आली.
या वेळी नारळी पोर्णिमेनिमित्त दर्शन घेण्यासाठी व दहीहांडी कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीसह, बाहेर गावातून भाविक लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते.या वेळी देवीचे मानकरी पालखीचे खांदेकरी,पुजारी, विविध भागतून आलेले आराधी,तसेच भावीक,महिला भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहीहंडी फोडण्या पूर्वी भजनी मंडळ,वारकरी मंडळ,आराधी मंडळांनी यात्रे करुंचे विविध लोक कला सादर करुन मनोरंजन केले यात पाऊल, शिवणापाणी,खो खो,फुगड्या,नकलांचे,पोवाडे, सादरीकरण केले.
.. नारळी पौर्णिमा दहीहांडीसह येडेश्वरी देवीची पालखी मिरवत जाणाऱ्या रस्त्यावर गावातील महिलांनी मोठं मोठया रंगबिरंगी रांगोळी, फुलांच्या रांगोळीने सजावट करुन पालखीला पायघड्या घातल्या होत्या.पालखीच्या दर्शनासह,गावातील लोक पालखीतील परशुरामच्या मूर्तीला कुंकाचा माळवट भरुन पालखीच्या खांदेकरी,यांच्या पायावर पाणी घालुन नेवैद्य दाखवण्यासाठी गर्दी केली होती.
नारळी पौर्णिमेला दरवर्षी पावसामुळे गाव प्रदक्षिणा करताना पालखीच्या मानकऱ्यांना पाण्यातून वाट काढत मोठी कसरत करुन पालखीची गावप्रदक्षिणा पूर्ण करावी लागते.पालखीच्या मानकऱ्यांची होणारी कसरत पाहून भाविकातून "हीच खरी देवीची भक्ती" असे उद् गार निघाल्या शिवाय राहत नाहीत. मात्र यंदा पाऊसमान कमी आसल्याने सोयाबीन पिकाच्या शेतातून पालखीची गावप्रदक्षिणा सोयीस्कर पार पडली.
0 Comments