Subscribe Us

उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल मधुकर तोडकर यांचा सत्कार


तेरणेचा छावा/कळंब:- 
     महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग MPSC च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमधून हासेगाव (केज) ता. कळंब येथील श्री मधुकर प्रल्हाद तोडकर यांची निवड उपशिक्षणाधिकारी वर्ग 2 पदी झाली आहे. याबद्दल बिक्कड सर मित्र परिवाराच्या वतीने मधुकर तोडकर यांचा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प. महादेव महाराज आडसूळ, स्व. गणपतराव कथले युवक आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब कथले, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, उद्योजक विठ्ठल माने, साहित्य परिषदेचे अध्यक्ष परमेश्वर पालकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल यादव, शिवव्याख्याते महादेव खराटे, मुख्याध्यापक निशिकांत आडसूळ, सहशिक्षक अविनाश खरडकर, जनार्दन धुमाळे, प्रदीप रोटे,ॠषीकुमार साबळे, संजय तांबारे,औषध निर्माता अधिकारी बाळासाहेब मोराळे ,व्यापारी सचिन गपाट व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ह भ प महादेव महाराज आडसूळ यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात कळंब च्या भूमिपुत्राने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून गौरव उद्गार काढले. याप्रसंगी उद्योजक विठ्ठल माने, मुख्याध्यापक परमेश्वर पालकर, अनिल यादव, बाळासाहेब कथले यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. श्री मधुकर तोडकर हे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले यानंतर स्पर्धा परीक्षेतून ते शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर निवड झाली. ते सध्या ते बीट तेर ता. जि. धाराशिव येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी श्री मधुकर तोडकर कळंब पंचायत समितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी व प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून उत्तम  कार्य केले आहे. याप्रसंगी मधुकर तोडकर यांनी सत्काराला उत्तर देताना हे यश मी माझ्या आई-वडिलांच्या चरणी अर्पण करतो व माणसाने आयुष्यभर नेहमी शिकत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, सूत्रसंचालन महादेव खराटे व आभार प्रदर्शन निशिकांत आडसूळ यांनी केले.

Post a Comment

0 Comments