कला केंद्र परिसरातील नागरिकात दहशतीचे वातावरण.अवैध धंद्यांना अभय कोणाचे.
तेरणेचा छावा/धाराशिव:-
चोराखळी येथील महाकाली केंद्रा जवळ दोन गटात झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झालेले असून येरमाळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
याविषयी सविस्तर वृत्त असे की पवन पौळ, रा. आळणी ता. जि. धाराशिव, अक्षय साळुंके रा. धाराशिव, राज पवार, रा. धाराशिव,विजय साळुंके रा. धाराशिव व इतर पाच अनोळखी इसम यांनी सोमवार दि.04 ऑगस्ट रोजी सायंकाळी 07.30 ते 08.00 वा. सु.महाकाली कला केंद्र समोर चोराखळी शिवार येथे तौसीफ सिकंदर तांबोळी, वय 24 वर्षे, रा. सांजा ता. जि. धाराशिव यांना संदीप यल्लाप्पा भुट्टे व रोहीत जाधव यांना आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, फर्शीचा तुकडा लाकडी दांडा व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-तौसीफ तांबोळी यांनी दि.05.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे येरमाळा येथे भा.न्या.सं.कलम118(2), 115(2), 352, 351(2), (3), 189(2), 191(2)(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तर दुसऱ्या तक्रारीत
संदीप यल्लाप्पा भुट्टे, रोहीत जाधव, रा. धाराशिव, तौफिक सिकदंर तांबोळी, रा. सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव इतर पाच इसम यांनी सोमवार दि. 4 ऑगस्ट रोजी 07.30 ते 08.00 वा. सु.महाकाली कला केंद्र समोर चोराखळी शिवार येथे विजय गोपीनाथ साळुंके, वय 25 वर्षे, रा. गणेश नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांना अक्षय साळुंके यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विजय साळुंके यांनी मंगळवार दि.05 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे येरमाळा येथे भा.न्या.सं.कलम118(1), 115(2), 352, 351(2), (3), 189(2), 191(2)(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अशाप्रकारे परस्पराविरोधी तक्रार झालेली आहे परंतु दवाखान्यात ऍडमिट असताना बंदुकीतून फायरिंग लागल्याचा आरोप नातेवाईककडून करण्यात आला होता. परंतु नंतर गोळीबारांची कुठलीही घटना घडलेली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्यामुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
चोराखळी साखर कारखाना ते टोल नाका आळणी फाटा हायवेच्या कडेला असलेल्या कला केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वरचेवर या भागात नवीन कला केंद्रात रोजच्या रोज वाढत होताना दिसून येत आहे. विद्यार्थी, युवकावर याचा मोठा दुष्परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे तसेच कला केंद्र मुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, आंबट शौकीन,अवैद्य धंद्यातील गुंड प्रवृत्तीचे लोक यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हाणामारी,मद्यपींचा धिंगाणा हे रोजचेच झाले आहे अशा प्रकारचा परिसरातील महिला ,विद्यार्थिनी सामान्य नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
0 Comments