तेरणेचा छावा/धाराशिव:-
धो धो पाऊस पडत असतानाही पडत्या पावसात गावागावात जाऊन मराठा सेवकांची टीम मनोज जरांगे पाटलांचा आदेश शिरस्त्रान मानून 27 ऑगस्ट चलो अंतरवाली सराटी मार्गे 29 ऑगस्ट चलो मुंबई जनजागृती अभियान करत आहेत. धाराशिव जिल्ह्यात जवळजवळ 84 टीम गावागावात जाऊन 27 ऑगस्ट चलो अंतरवाली सराटी मार्गे मुंबई जनजागृती कार्यक्रम सकाळ, संध्याकाळ मोठ्या उत्साहात पार पाडत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील 8 आठ तालुक्यात मराठा सेवक सकाळ संध्याकाळ गावात जाऊन मराठा आरक्षण जनजागृती कार्यक्रम उत्साहाने पार पाडत आहेत. काही गावात हलक्या,ढोल, दवंडी, गाव फेरी, करत गावातील समाज मंदिर, मंदिर, मोकळ्या जागेत जनजागृती त्यास गावकरीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहेत.काही मराठा सेवकांनी आपल्या वाहनावरच लाऊड स्पीकरची सोय केलेली असून गावातील चौका चौकात जाऊन जनजागृतीचे काम हाती घेत आहेत.
खेडेगावातील मराठा समाजासह सर्व समाजाच गावकरी बांधव मोठ्या उत्साहात या टीमचे स्वागत करून जनजागृती कार्यक्रमास हजेरी लावून प्रतिसाद देताना दिसून येत आहेत.
मराठा समाज बांधवांच्या टीमने जिल्ह्यातील जवळजवळ 98 टक्के गावात जनजागृती काम पूर्ण केलेले असून 2 टक्के शिल्लक गावातही जनजागृती लवकरच 2 ते 3 दिवसात पूर्ण करणार असल्याचे मराठा सेवकांनी सांगितले.
गावागावातील मराठा समाज बांधव व इतर समाज बांधव मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्यामुळे जिल्ह्यातून हजारो वाहने 27 ऑगस्ट अंतरवाली सराटीसाठी निघणार असल्याचे दिसून येत आहे. नोकरदार,शेतकरी व्यवसायिक व सर्व क्षेत्रातील मराठा बांधव आपली सर्व कामे 27 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करून सर्व ताकतीने मोर्चात सामील होणार आहे. यासाठी मराठा सेवकांनी पूर्णपणे आपली सर्व ताकद पणाला लावून सर्व तयारी झालेली असून यात काही त्रुटी राहू नयेत याचीही काळजी सर्व मराठा सेवक घेत आहेत.
0 Comments