Subscribe Us

ई पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याची शेतकऱ्यांची मागणी.


तेरणेचा छावा/कळंब:-
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्यामुळे आलेल्या पिकांच्या भरोशावर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमलणारा आनंद संततधार पावसाच्या सरीमध्ये हरवत चाललेला आहे.या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे.परिणामी उत्पन्नाची शाश्वती तर नाहीच
परंतु नुकसान भरपाई, पिक विमा मिळावा या अपेक्षेत शेतकरी आहेत.यासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करावी लागत आहे.परंतु सध्या ई पीक पाहणी ॲप चालत
नसल्यामुळे कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई पिक पाहाणी संदर्भात निर्माण होणाऱ्या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात असे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दिले आहे. 
निवेदनात म्हटले की,पिकांची ई पिक पाहणी करत असताना सदर ॲप सतत बंद पडत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई,अनुदान,पिक विमा यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ई पिक पहाणी संदर्भातील अडचणी 
सोडवाव्यात.निवेदनावर बब्रुवान गोरे,प्रवीण जाधव अंगत शिंदे श्रीहरी वर्पे .......
यांच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

0 Comments