धाराशिव :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ धाराशिव यांच्या वतीने आज मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ पासून विविध मागण्यांसाठी जिल्हाभरात व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
*दिनांक १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे, बदली धोरण लागू करणे, वेतन वाढ करणे, ईपीएफ लागू करणे, आरोग्य आणि अपघात विमा लागू करणे, बदली धोरण राबवणे, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील ८७० पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, औषध निर्माता, स्टाफ नर्स, एल एच व्ही., टेक्निशियन, लेखापाल, पॅरामेडिकल स्टाफ इत्यादी बेमुदत आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.*
यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री किरण बारकुल, राज्य समन्वयक श्री जीवन कुलकर्णी, सचिव श्री किरण तानवडे यांनी यावेळी आंदोलनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश पाटील, डॉ. अमर तानवडे, डॉ. विक्रांत राठोर, डॉ. अब्रार शेख, भारत हिंगमिरे, अशोक चव्हाण, संतोष कोरपे, किशोर तांदळे, किशोर गवळी, जयराम शिंदे, राजेंद्र पवार, शरद बोने, नीरज कांबळे, योगेश पवार, जालिंदर माळी, शरद नाईकनवरे, यादव, मुळे, पांडुरंग कोळेकर, गणेश चव्हाण, विशाल नेत्रगावकर, संतोष पोतदार, अनंत लहाने, विशाल जगदाळे, ज्योती कदम, पल्लवी भालेराव, सस्ते असे विविध कर्मचारी यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये उपस्थित होते. या आंदोलनामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय आयुष्य कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम या विविध कार्यक्रमाच्या कामकाजांवर जिल्हाभरात परिणाम होण्याची शक्यता आहे.
0 Comments