तेरणेचा छावा/धाराशिव:-
आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार (दि.10 ऑगस्ट) रोजी शहरातील शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
कळंब पंचायत समितीचे माजी उपसभापती भगवान ओव्हाळ यांची शिवसेना कळंब तालुका उपप्रमुख पदी निवड करण्यात आली तर येरमाळा विभाग प्रमुख पदी संजय बाबा बारकुल ,मोहा विभाग प्रमुख पदी रामकिसन वाघमारे ,ईटकुर विभाग प्रमुख पदी बालाजी कवडे,
पळसप विभाग प्रमुख पदी समाधान फेरे ,आंबेजवळगा विभाग प्रमुख पदी अविनाश गोफणे ,उपळा विभाग प्रमुख पदी रामचंद्र कदम यांची निवड करण्यात करून नियुक्तीपत्र जिल्हाप्रमुख सुरेश साळुंखे व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, कल्पनाताई माळी, कामगारसेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ डोलारे,कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अंकुशे, शहर प्रमुख आकाश कोकाटे,
युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे,उपतालुकाप्रमुख काका वाकुरे, उपतालुकाप्रमुख धनाजी साळुंके, उपतालुकाप्रमुख सुमित गायकवाड,उपतालुकाप्रमुख रामेश्वर मगर, भीम अण्णा जाधव, प्रवीण पवार, नवनाथ सूर्यवंशी, प्रशांत कोळी,व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला.
0 Comments