Subscribe Us

स्वयंसिद्ध महिला प्रोडूसर कंपनीच्या महिल़ांची त्रासाला कंटाळून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार


तेरणेचा छावा/धाराशिव:-
         माहिती अधिकार कार्यकर्ते त्रास देत असल्याचे निवेदन स्वयसिद्ध शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या महिला संचालकांनी शनिवार (दि. 9 ऑगस्ट) रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. 
याविषयी सविस्तर वृत्त असे की    स्वयंसिद्ध शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या महिलांवर अन्याय होत आहे.हि कंपनी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील महिलांसोबत काम करतं आहे.ही कंपनी शेंन्र्दीय शेती,गट शेती,क्रषीआधारित उद्योग,पाणी/वृक्ष संवर्धन,महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्याचे काम करत आहे . यामध्ये काही महिला अशिक्षित आहेत तर काही महिला शिकलेल्या आहेत.काहि महिला खुप गरिब परिस्थिती मधील आहेत.त्यामुळे फक्त 100 रु सभासद फिस घेऊन कंपनी साठी अधिकृत द्रष्ट्या सभासद करुन घेण्यात आले आहेत 
          प्रशासनातील सर्व विभागाचे सहकार्य आणि लाभ आणि मार्गदर्शन महिलांना मिळत आहेत.सण 2024-25 मध्ये महिलांच्या मागणी नुसार ज्वारीचे मिनिकिट बियाणे सर्व बाबींची पूर्तता केल्या नंतर निवड करून मोफत वाटप करण्यात आले. आम्ही फोटो व वाटप याद्या मोबाईल नंबर सह कृषी विभागास सादर केल्या.आमच्या भागात ज्वारी हे पिक कमी पाण्यावर येते आणी जनावरांची चार्याची सोय होते म्हणून हे उत्पादन खुप मोठ्या प्रमाणात घेतले जाते.या बियानाचा सभासदांना चांगला उपयोग झाला.या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले 
       आता सध्या माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी बियाणे यादि मागवली.आम्ही यादि मोबाईल नंबर सहित कृषी विभाग कळंब यांना दिली.पण आता काही लोक मद्यपान करून आमच्या महिलांना फोन करुन त्रास देत आहेत.काहि महिलांचे मोबाईल पती किंवा मुलाकडे असतात.त्यांना देखिल वारंवार वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरुन फोन करुन परेशान केले जात आहे.यामुळे कौटुंबिक वातावरण खराब होत आहे. ३००-४००  रु लाभ नाही कुठे, आणी मानसिक त्रास मात्र खुप होत आहे.आम्ही मोबाईल नंबर सहित यादि दिल्यामुळे त्याचा गैरवापर केला जात आहे.सदरिल व्यक्ती कोण आहे त्याचा उद्देश काय आहे,त्याचे मोबाईल रेकाॅर्ड चेक करावे.अन्यथा  आम्ही सर्व महिलाना पालक मंत्री आणि महिला आयोगाकडे दाद मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
        वाईट वृत्तीच्या लोकांच्या हातात यादि गेलेली असल्या कारणाने.महिलांना धमक्या दिल्या जात आहेत.तुम्हाला जमिनी आहेत का नाहीत, जमिन तुमच्या स्वतःच्या नावावर आहे का,तम्ही बियाणे पेरले की विक्री केले,अशी चौकशी करीत आहेत .महिलांमध्ये सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.स्वयंसिद्ध शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या डायरेक्टरनी खुप कष्ट करून महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.आता सध्या महिलानी सुधारित सेंद्रिय शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती.सध्या महिलांच्या चांगल्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.महिलांची सरळ सरळ चर्चा करून बदनामी चालू केली आहे.प्रत्येक गावात महिलांची बैठक लावुन चौकशी करण्यात यावी . आम्ही खूप मोठा गुन्हा केला असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करावेत व  आमचे काम बरोबर असेल तर जाणीवपूर्वक महिलांचे खच्चीकरण करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत पण मोबाईलवर फोन करून त्रास देऊ नये .यामुळे चांगले काम उभ करीत असताना मानसिक त्रास होणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी कारण  या महिलांची संख्या खूप मोठी आहे. नसेल तर सदरील कंपनी आणि महिला गटांचे काम करावे की नाही याचे मार्गदर्शन करावे.मा.जिल्हाअधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी या विषयामध्ये वयक्तिक लक्ष देऊन  महिलांना सहकार्य करावे अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
    या निवेदनावर स्वयंसिद्ध प्रोडूसर कंपनीच्या महिला संचालक दिपाली जाधव, रंजना कदम, सुप्रिया पौळ, दीपा शिंदे, जयमाला भातलवंडे, शितल वाकुरे ,धनश्री निरफळ , शुभांगी कदम, मिराधोंगडे  अश्विनी शेळके यांच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

0 Comments