कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे जिल्हा परिषद प्रशाळा /जगदंबा कन्या प्रशाला आणी अनुलोम अनुगामी लोकराज्य महाअभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संविधान जागृती कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी अक्षय माडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रमुख वक्ते प्रभाकर बाभळे सर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजना(अंजली) कदम यांनी केले.मुलांसोबत संवाद साधला.कोणाकोणाला पंतप्रधान व्हावे असे वाटते म्हणून प्रश्न विचारले.नरेंद्रजी मोदि सर्वसामान्य कुटुंबातुन पंतप्रधान होऊ शकतात मगं आपन का नाही होऊ शकत.राष्ट्पती कोणाला होऊ वाटते म्हणून विचारलं मुलांच्या मनातील अडचणी जाणून घेतल्या.द्रोपदि मुर्मू आदिवासी भागातील महिला राष्ट्रपती होऊ शकते तर तुम्ही का नाही अशी चर्चा मुलांसोबत केली.संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला आहे.
प्रभाकर बाभळे सरांनी आपल्या व्याख्यानात भारतीय संविधानाची ओळख, मुलंभुत तत्वांची माहिती दिली.जबाबदार नागरिकत्वाचे महत्व आणि कर्तृव्य पीपीटी, माहितीपट याद्वारे प्रभावीपणे सांगितले.शेवटी विद्यार्थ्यांकडुन संविधानावर आधारीत प्रश्नावली सोडवुन घेण्यात आली
या कार्यक्रमास जिल्हा परिषद प्रशालेतील मुख्याध्यापक श्री पवार सर,शिक्षक श्री रसाळ सर,याचे मोलाचे सहकार्य लाभले.जगदंबा कन्या प्रशाला येथे मुख्याध्यापक श्रीमती सावंत मॅडम,शिक्षक श्री शिंदे सर,श्री गर्जे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमास165 विद्यार्थी सहभागी झाले सुत्रसंचलन श्री. समाधान गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सुनिल पाटील यांनी केले
0 Comments