Subscribe Us

पालकमंत्री प्रताप सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्ह्यात.





तेरणेचा छावा/धाराशिव:- पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १४ व १५ ऑगस्ट रोजी दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.दुपारी २ वाजता लातूर येथून खामसवाडी येथे आगमन व स्वर्गीय दत्तात्रय उर्फ अनिल गुंड यांच्या कुटुंबास सांत्वन  भेट.दुपारी २.३० वाजता खामसवाडी येथून शासकीय वाहनाने परांडाकडे प्रयाण.दुपारी ४:३० वाजता परंडा येथे आगमन व श्री. दत्ता साळुंखे जिल्हाध्यक्ष यांच्या कुटुंबास सांत्वन भेट.सायंकाळी ५ वाजता परांडा येथून शासकीय वाहनाने धाराशिव शहराकडे प्रयाण.सायंकाळी ६:४५ वाजता धाराशिव शहर येथे आगमन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट.सायंकाळी ७:४५ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून शासकीय वाहनाने कपालेश्वर मंदिरकडे प्रयाण.रात्री ८ वाजता कपालेश्वर मंदिर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी सोहळ्यास उपस्थिती.रात्री ८:४५ वाजता शासकीय वाहनाने विश्रामगृहकडे प्रयाण.रात्री ९ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
    १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८:४५ वाजता शासकीय विश्रामगृह धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी ८:५५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन.सकाळी ९:०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण येथे आयोजित ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती.सकाळी १० वाजता नियोजन भवन सभागृहात आयोजित धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती.सकाळी ११ वाजता तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ च्या संदर्भात आढावा बैठक. सकाळी ११:३० वाजता जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत आढावा बैठक.दुपारी १२ वाजता मराठा समाज भवन जागा निश्चिती संदर्भात बैठक. दुपारी १२:३० वाजता श्रीक्षेत्र श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा  राबविताना विस्थापित पुजाऱ्यांना जागा निश्चित करण्याबाबत आढावा बैठक.दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात धाराशिव येथून सोलापूरकडे प्रयाण करतील.
        

Post a Comment

0 Comments