दहिफळ/तेरणेचा छावा:-
संजीतपूर येथील शेतकरी समाधान वैजिनाथ बाराते यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याच्या कारणामुळे त्यांची शेतात पेरणी झालेली नाही. रस्त्याच्या मागणीसाठी मंगळवार दि. 29 जुलै पासून शेतातच तेरणा नदीकाठी अमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन कळंब तहसीलदारांना देण्यात आले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की सापनाई ता. कळंब येथील जमीन गट नं. ३९१ या गट नंबरचे दक्षिण बाजुकडील तेरणा नदीच्या भरावावरुन असलेला रस्ता वहिवाटीसाठी पुर्वपार चालत आलेला सापनाई ते संजितपुर ग्रामीण मार्ग रस्त्यास जोडणारा पुर्व-पश्चिम रस्ता अर्जदाराच्या शेतात ट्रॅक्टर, बैलगाडी, शेती औजारे ने. आण करण्यास व ये-जा करण्यास खुला करुन मिळणेसाठी दिनांक ०६/०५/२०२५ रोजी अर्ज सादर केलेला आहे. अर्जामध्ये अर्जदाराच्या जमीन वहिवाटण्यासाठी कोणताही रस्ता नसल्याचे मे. न्यायालयाचे लक्षात आणुन दिले आहे, तसेच सदर रस्ता
खुला करण्याची अत्यंत निकड असल्याचे देखील गांभिर्याने सांगीतले आहे. तसेच सदरील जमीन रस्त्याअभावी पडीक असल्याचे तोंडी व लेखी वारंवार निदर्शनास आणुन दिले आहे. तसेच त्यासंबंधी मा. तहसिलदार साहेब, कळंब यांनी स्वतः स्थळपाहणी केलेली आहे.
वरील प्रमाणे परिस्थीती असतांना देखील अद्याप जमीन वहिवाटण्यासाठी रस्ता खुला करुन देण्यात आलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्याची जमीन पेरणी करण्याची राहुन गेलेली असुन जमीन पडीक आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असल्याने नाविलाजास्तव दि.२९ जुलै रोजीपासुन बेमुदत शेतालगत असलेल्या तेरणा नदीकाठी नाविलाजास्तव अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे पावसाच्या दिवसात तेरणा नदीकाठी धोकादायक असतानाही न्यायासाठी उपोषणाला बसणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळतो की उपोषणाला बसल्यानंतरच न्याय मिळतो हे समजणार आहे.
0 Comments