Subscribe Us

पतसंस्था सक्षमीकरणासाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


तेरणेचा छावा/धाराशिव:- 
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित एकदिवसीय "पतसंस्था सक्षमीकरण प्रशिक्षण शिबिर" रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत हरी ओम मंगल कार्यालय व लॉन्स केवडकर नगर तुळजापूर येथे पार पडणार आहे.
         या शिबिरात पतसंस्थांच्या व्यवस्थापन,आर्थिक शिस्त,नवीन तंत्रज्ञानाचा वापर, नियम व धोरणांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
     कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रवीण फडणीस,विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था), लातूर
 पांडुरंग साठे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), धाराशिव
 ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांची उपस्थिती राहणार आहे.
      राजन पाटील, महाराष्ट्र राज्य सहकार परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हनुमंत भुसारे, नियामक मंडळ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल  सत्कार करण्यात येणार आहे.
        या कार्यक्रमासाठी निमंत्रक श्री सिद्धिविनायक पतसंस्थेचे अध्यक्ष. दत्ता कुलकर्णी, रूपामाता पतसंस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड,तुळजाभवानी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोजुल, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे श्रीकांत साखरे, मंगलनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र कानडे, जनहित पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.संतोष तौर ,तुळजाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देशमाने , यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश दंडनाईक उपस्थित राहणार आहेत.
            या शिबिरात विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी व हितधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments