तेरणेचा छावा/धाराशिव:-
धुळे सोलापूर 211 हायवे वरील येरमाळा नजीक हायवेवरील चोऱ्यांचे प्रमाण कमी न होता वरचेवर वाढतच असल्याचे पहावयास मिळत आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की दिनेश शिवराज गवशेट्टी, वय 40 वर्षे, रा. 124/3 रेल्वे लाईन काडादी चाळ सोलापूर हे अहमदाबाद ते बेंगलोर कंपनीचे पार्सल पर्चुटन माल घेवून जात असताना मंगळवार दि. 22 जुलै रोजी रात्री 11.50 ते बुधवार दि. 23 जुलै रोजी पहाटे 12.30 वाजण्याच्या सुमारास येरमाळा ब्रिज ते वडगाव ब्रिज प्रवासा दरम्यान अज्ञात व्यक्तीने ट्रक क्र केए 25 एए 0527 ची ताडपत्री फाडून 13 पिस सिल्क साडी, 144 पिस रेडीमेड कुर्ती,11 पिस लेडीज ड्रेस, 2 नग पंजाबी सुट, अग्रेबॉक्स फायटर शेतातील खत एक बॉक्स असा एकुण 57,974₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा _मजकुराच्या फिर्यादी नामे-दिनेश गवशेट्टी यांनी दि.25.07.2025रोजी_ दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305(बी), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी चोऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी सीसीटीव्ही सह लागेल ती यंत्रणा कामाला लावण्याच्या सूचना दिलेल्या असतानाही चोऱ्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वाहन चालकांमध्ये व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
0 Comments