Subscribe Us

ऑपरेशन सिंदुर बाबतची भूमिका जगासमोर भक्कमपणे मांडणारे खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांचा धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने सत्कार


तेरणेचा छावा/धाराशिव - 
पाकिस्तान्यांनी पेहेलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारत देशाने ऑपरेशन_सिंदुर मोहीम राबवून दहशतवाद्यांना नामोहरम केले. 
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर  खासदार डॉ.श्रीकांत एकनाथजी शिंदे यांनी भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईबाबत  देशाची बाजू जगभरातील विविध देशात जाऊन मांडली. तसेच पाकिस्तानबाबतही विविध देशाच्या प्रतिनिधींची मते जाणून घेतली. या दौर्‍यावरुन परतल्यानंतर धाराशिव जिल्ह्याच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा सत्कार केला.
    ऑपरेशन सिंदुरच्या यशानंतर जागतिक पातळीवर खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने विविध देशाचा दौरा केला. 
या दौर्‍यात जागतिक स्तरावर खा.डॉ.शिंदे यांनी भारताची भूमिका भक्कमपणे मांडली. युएई, लायबेरिया, कांगो, सिएरा अशा विविध देशांमध्ये त्यांनी ऑपरेशन सिंदुरबाबत मते जाणून घेत पाकिस्तानच्या कुटील धोरणाबाबतही त्यांनी चर्चा केली. अनेक देशांनी दहशतवादाला पोसणार्‍या पाकिस्तानबाबत नकारात्मक वक्तव्य केल्याचे खासदारांच्या शिष्टमंडळाला दिसून आले. अनेक देशांनी भारताच्या दहशतवादाविरोधातील भूमिकेचे समर्थन केले. 
      दौरा यशस्वीपणे पार पडल्यानंतर खा.डॉ.श्रीकांत शिंदे हे भारतात परतले असता त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने 
जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांची ही भूमिका शिवसैनिकांसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
    यावेळी युवासेना शहरप्रमुख सागर कदम, 
आकाश कोकाटे यांच्यासह धाराशिव जिल्हा शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments