कळंब/तेरणेचा छावा:-
कळंब तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली असून पुढील 2 वर्षासाठी नवे पदाधिकारी निवडण्यात आले आहेत. डॉ.शाम चौधरी यांची अध्यक्षपदी निवड झाली असून श्रीमती डॉ. अशपाक शेख यांची उपाध्यक्ष, डॉ. सुशील अडसूळ यांची सचिव तर डॉ. संदीप पाखरे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीला मावळते अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोरे यांनी अनुमोदन देऊन नव्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत कळंब तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ही वैद्यकीय सेवा सोबतच सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेली संघटना आहे. कोविड महामारी दरम्यान संघटनेच्या डॉक्टरांनी शासकीय आयटीआय कळंब येथे सेवा देत कोविड केंद्रावर मोलाचे योगदान दिले. याशिवाय वृक्ष लागवड, बेटी-बचाव बेटी पढाव,स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध,आरोग्य विषयक जनजागृती आणि सर्व शासकीय आरोग्य उपक्रमांमध्ये संघटनेचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. नवीन कार्यकारिणीकडूनही याच कार्याचा वारसा अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेणे,आरोग्यसेवा अधिकाधिक सक्षम व रुग्णाभिमुख करणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढवणे या दृष्टीने ही कार्यकारणी कळंब तालुक्यात प्रभावी ठरेल असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रासह नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल मित्रपरिवारातून अभिनंदन होत आहे.
0 Comments