तेरणेचा छावा/कळंब:-
कळंब तालुक्यातील संजीतपुर येथील समाधान बाराते यांची कळंब- धाराशिव शिवसेना (उ.बा.ठा.) च्या विधानसभा संघटकपदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कळंब - धाराशिव विधानसभेसाठी संघटक म्हणून कळंब तालुक्यातील संजीतपुरच्या समाधान बाराते यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. ही घोषणा शिवसेना भवन, मुंबई व शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून करण्यात आली. राजकारण आणि समाजकारण यामध्ये तळमळीने आणि निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने ही जबाबदारी सोपवली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून समाधान बाराते हे शिवसेनेचा प्रचार व प्रसार ग्रामीण पातळीवर अत्यंत जोमाने करत आहेत . बाराते यांनी निराधार लोकांसाठीच्या योजनेचा, शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा लाभ लोकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सर्व शासकीय योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत. या सर्व कामांमुळे खा. ओमराजे निंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून पक्षकार्य अधिक गतिमान करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली आहे. बाराते यांच्या निवडीमुळे शिवसैनिक व युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक, राजकिय, व सांस्कृतिक क्षेत्रांमधुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments