Subscribe Us

जागतिक योग दिनानिमित्त लेह-लडाखमध्ये भव्य कार्यक्रम — महामहिम राज्यपाल आरिफ मोहम्मद खॉंन यांच्यासमवेत महाबोधी बिहार संदर्भात विचारमंथन


तेरणेचा छावा/धाराशिव:– जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने लेह-लडाख येथे दिनांक 15 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये बिहारचे राज्यपाल महामहिम मा. आरिफ मोहम्मद खॉंन यांनी विशेष सहभाग नोंदवला.
    या कार्यक्रमादरम्यान, महाबोधी बिहार बुद्धगया या ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. या चर्चेमध्ये भिक्खू संघसेना महाथेरो, डॉ. सत्यनामसिंग संधुजी (सांसद व कुलगुरु, चंदीगड विद्यापीठ, पंजाब), तसेच भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो (कार्याध्यक्ष, अखिल भारतीय भिक्खू संघ) हे उपस्थित होते.
    यावेळी बुद्धभूमीच्या जतन, संवर्धन व जागतिक पातळीवरील योग-ध्यान प्रसारासंदर्भात अनेक विचारमंथन झाले. योग, ध्यान आणि बौद्ध तत्त्वज्ञान यातील साम्यरेषा अधोरेखित करताना महामहिम राज्यपालांनी भारताच्या समृद्ध अध्यात्मिक वारशाचे महत्त्व अधोरेखित केले.
    हा कार्यक्रम अध्यात्म, योग आणि जागतिक शांततेसाठी भारताच्या प्रयत्नांचा प्रतीक ठरला असून, लडाखसारख्या आध्यात्मिक स्थळात अशा संवादांना विशेष महत्त्व आहे.

Post a Comment

0 Comments