तेरणेचा छावा/धाराशिव:-
अर्धवट काम झालेल्या बसस्थानकाचे उद्घाटन,उद्घाटनासाठी काम पूर्ण करण्याची गडबड, गुणवत्तेचे काय? साहेब अधि काम बघा मग दर्जा बघू!चर्चेला उधाण या शीर्षकाखाली तेरणेचा छावा लाईव्ह वर शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. बातमी प्रकाशित होतात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी तातडीने बसस्थानकाची पाहणी करत काम दर्जेदार,गुणवत्तापूर्ण करण्याची सक्त ताकीद देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पाहणीदरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मेकॅनिकल इंजिनिअर श्री.थोरबोले,डेपो मॅनेजर भांगे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी बसस्थानकाच्या कामाची सविस्तर पाहणी केली आणि बांधकामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.पाहणीच्या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत कामाच्या गुणवत्तेबाबत चर्चा केली आणि आवश्यक सुधारणा व कामाच्या गतीसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.यामुळे बसस्थानकाच्या विकासकामांना आवश्यक वेग व गुणवत्ता मिळण्यास मदत होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
जिल्ह्याच्या विकासात भर घालणारे बसस्थानक सुसज्ज व भक्कम असणे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.उद्घाटनासाठी निकृष्ट काम सुरू असल्याचे नागरिकांनी तेरणेचा छावा लाईव्हच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आम्ही आवाज उठवल्यानंतर तातडीने कामाची पाहणी करत संबंधितांना सक्त सूचना केल्यामुळे नागरिकांतून तेरणेचा छावा चे आभार व्यक्त होत आहे.
त्यामुळे संबंधित कामाची पाहणी झाल्यानंतर सुद्धा काम दर्जेदार होईल की नाही याविषयीही नागरिकांतून साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने बस स्थानकाचे काम गुणवत्तापूर्ण व टिकाऊ कसे होईल याकडे स्वतः लक्ष घालणे गरजेचे आहे.
0 Comments