तेरणेचा छावा/दहिफळ:-
कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील मेसाई देवीची यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली.
यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी भव्य सोंगे व 23 एप्रिल रोजी जग्गी कुस्त्यांचे आयोजन यात्रा कमिटीने केले होते.मेसाई देवीच्या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे सोंगे होय.जिल्ह्यातील बोलकी सोंगे काढणारे एकमेव बाभळगाव येथील कलाकारांनी सोंगाची परंपरा जपली असुन प्रत्येक वर्षी कलाकार मोठ्या उत्साहात सोंगे साजरी करतात.
रामायण कथेवर आधारित सोंगे नटवली जातात.रावणाचे सोंग करणारे कलाकार ८१ वर्षाचे आहेत.स्वत: रावणाचे मुखवटे तयार केले असून प्रत्येक वर्षी शिष्टाचार रावणाचे सोंग दत्तू जयवंत वाघमारे साकारतात.
हत्तीवर बसलेले राजा -इश्वर रामकिसन वाघमारे (वय १६ वर्ष) राणी - अशोक , गणपती-हिंमत वाघमारे
अंगदाचे सोंग ,श्रीकांत महादेव वाघमारे
दशानंद रावण,नारायण बब्रुवान वाघमारे, नवनाथ जमाले,अमोल गोरख वाघमारे,राम लक्ष्मण ,अण्णा भारत वाघमारे,सदाशिव तुळशीराम वाघमारे, वैभव अंकुश वाघमारे, डिगांबर बिभीषण वाघमारे.
कंस -मधुकर नवनाथ वाघमारे,च्यानुर - राजन चंद्रकांत वाघमारे,मुस्टिक- चंद्रकांत परशराम वाघमारे,कृष्णा बलराम- बिभीषण निवृत्ती वाघमारे, प्रदीप श्रीधर वाघमारे बाळासुर -लक्ष्मण चौधरी ,भस्मासुर - विश्वनाथ जमाले,
तारकासुर- रामहारी बेडके, महादेव- भागवत वाघमारे
वय ७१ वर्ष, मनक्याचा आजार आहे.पुर्ण शरिर थरथरते तरीही महादेवाचे सोंग साकारले आहे.
कौरव- शिवाजी भातलवंडे, भारत चौधरी, हनुमंत करडे, तेजस चांगदेव वाघमारे,पांडव- विलास शिंदे ,अभिमान सावंत, अण्णा बाळासाहेब वाघमारे, शिवाजी चत्रभूज वाघमारे, अमोल बिभीषन वाघमारे.म्हातापाची गाडी- मल्हारी कांबळे, बाबुराव कांबळे, उत्तम वैजनाथ वाघमारे, महादेव अंगरखे. अदी कलाकारांनी सोंगात सहभागी होऊन सोंगाची परंपरा जपली आहे
अर्धांगवायूचा झटका आलेला असतांनाही रावणाचे सोंग साकारले.
रावण साकारणारे दत्तु नाना वाघमारे हे सर्वात जेष्ठ ८१ वर्षीय कलाकार आहेत.सोंगाची सुरवात कधी पासुन झाली याची माहिती नसुन ते स्वत: बालपणापासुन सोंगं पाहतात. वयाच्या २० वर्षांपासून पासुन आजतागायत ५० वेळा रावण साकारला. ४ महिण्यापुर्वी आर्धांगवायुचा झटका येऊन गेलेला तरी ताकतीने रावण साकारला.
-दत्तू जयवंत वाघमारे कलाकार.
यात्रेनिमित्त भव्य जग्गी कुस्त्यांचा फड रंगला.
सोंगाचा कार्यक्रम संपल्यावर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी येडशी, तेरखेडा,दहिफळ,सापनाई,वैराग, देवळाली येथील मल्लांनी सहभाग घेतला.तसेच महिला मल्लांनी खास उपस्थित राहून कुस्ती केली.
जवळपास तीन तास कुस्त्यांचा खेळ चालला.निकाली कुस्ती देवळाली येथील हनुमंत तौर यांनी जिंकली.
यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष हनुमंत टेकाळे, विशाल वाघमारे, पांडुरंग वाघमारे, कमलाकर वाघमारे, रत्नदीप वाघमारे, दत्ता वाघमारे, राजेश वाघमारे,आसराम वाघमारे,केशव वाघमारे,डिंगाबर कोल्हे, शिवाजी चौगुले, हरिभाऊ वाघमारे, कृष्णा वाघमारे,राहूल वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments