Subscribe Us

चालत्या ट्रकमधून ताडपत्री फाडून व्हिस्कीचे बॉक्स येरमाळा हद्दीतून तर खाद्यतेलाचे बॉक्स येडशी जवळून चोरट्याने केले लंपास.

   

तेरणेचा छावा/धाराशिव:-
येरमाळा ते नाथवाडीपाटी, सोलापूर बीड हायवेवर चालत्या ट्रक मधून पायपर्स ब्लेंडड स्कॉच व्हिस्की 12 ईअर च्या 6 कार्टून किंमत 60,000 रुपयाचा  माल ताडपत्री फाडून लंपास केल्याची घटना शुक्रवार (दि.18 एप्रिल )रोजी पहाटे तीन ते साडेतीन च्या सुमारास घटना घडली आहे.
     याविषयी सविस्तर माहिती अशी की रघुवीर बनवारीलाल राठोर, वय 30 सुभाषनगर ग्वालीअर राज्य मध्यप्रदेश हे  ट्रक एमएच 40 एके 2503 हे आपले ट्रक बीड - सोलापूर  एनएच 52 रोडवरील येरमाळा ते नाथवाडी पाटी दरम्यान ट्रक मधील पायपर्स ब्लेंडड स्कॉच व्हिस्की 12 ईअर च्या सहा कार्टुन  बॉक्स मध्ये 150 बाटल्या असे एकुण 60,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीनी ट्रकच्या मागील ताडपत्री फाडून दि.18.04.2025 रोजी 03.00 ते 03.30 वा. सु. एनएच 52 रोडवरील येरमाळा ते नाथवाडी पाटी जवळ चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रघुवीर राठोर यांनी दि.18.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305(सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  येडशी जवळ खाद्यतेलाचे 25 बॉक्स गायब 
तर लातूर बार्शी रोडवर येडशी जवळ खाद्यतेलाचे 13 बॉक्स आयशर टेम्पो ची ताडपत्री फाडून चोरून नेल्याची घटना घडली आहे
    याविषयी सविस्तर असे की-विशाल अशोक गोबाळे, वय 25 वर्षे, रा. वागदरी ता.गंगाखेड जि. परभणी ह.मु. पाखर सांगवी ता. जि. लातुर हे दि.17.04.2025 रोजी 02.00 वा. सु.लातुर ते बार्शी जाणारे रोडवर येडशी येथील सम्राट हॉटेल पासून काही अंतरावर आयशार टॅम्पो क्र एमएच 13 सीयु 2555 यामध्ये भरलेले खाद्यतेलाचे 13 बॉक्स एकुण 25,480 ₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने टेम्पोची ताडपत्री फाडून चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विशाल गोबाळे यांनी दि.18.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments