श्री विठ्ठल रुक्मिणी व जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज मूर्ती प्रतिष्ठापनेचे आयोजन
धाराशिव/तेरणेचा छावा:- तालुक्यातील आळणी शिवारातील ढोकी रोड लगत असलेल्या भक्तीधाम येथे श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री जगद्गुरु तुकाराम महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचे आयोजित करण्यात आले आहे. ही प्राणप्रतिष्ठापना श्री संत तुकोबाराय यांचे वंशज बापूसाहेब देहुकर महाराज, छत्रपती संभाजी महाराज भोसले व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते दि.२ मार्च रोजी करण्यात येणार आहे.
प्राणप्रतिष्ठापना निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन दि.२८ फेब्रुवारी ते ८ मार्च यादरम्यान आयोजन केले आहे. या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आ.कैलास पाटील, राणाजगजितसिंह पाटील, तानाजीराव सावंत, प्रवीण स्वामी, धाराशिव तहसिलदार डॉ मृणाल जाधव, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, माजी सदस्य ऍड मिलिंद पाटील, जि. प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी, धनेश्वरी शिक्षण समूहाचे डॉ प्रतापसिंह पाटील, श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्रमुख सुधीर पाटील, माजी उपनगराध्यक्ष अमित शिंदे, सिद्धिविनायक उद्योग समूहाचे प्रमुख दत्ताभाऊ कुलकर्णी, ढोकी येथील त्रिमूर्ती उद्योग समूहाचे सुभाष देशमुख, नानासाहेब मुंडे,ॲड गजानन चौगुले, बापूसाहेब समुद्रे, माजी नगरसेवक सोमनाथ गुरव, धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, भाजपचे नितीन काळे, आळणीचे सरपंच प्रमोद वीर, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे संजय निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, सरस्वती हायस्कूलचे अध्यक्ष अशोक पवार,ॲड राम गरड,ॲड सोमनाथ वरपे,भाजपचे विनोद गपाट,सुधाकर बुकन, उद्योजक आकाश तावडे,येडशीच्या सरपंच डॉ सोनिया पवार,उपसरपंच गजानन नलावडे,यादव, उद्योजक देवदत्त मोरे, शिवसेना (ठाकरे) शहर संघटक बापू साळुंके, उद्योजक आर आर श्रीखंडे, स्वाधार मतिमंद मुलींच्या वसतिगृहाचे संस्थापक अध्यक्ष शहाजी चव्हाण, रामचंद्र खापरे, यशदा उद्योग समूहाचे सुधीर सस्ते, धाराशिव पं.स. माजी सभापती संजय लोखंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम जिल्हाभरातील हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर तांबे महाराज आळणीकर यांनी केले आहे.
.
0 Comments