श्रीगुरु बापुसाहेब मोरे देहुकर, बाळासाहेब मोरे पंढरपूरकर महाराज,आ कैलास पाटील,डॉ सचिन ओंबासे,जीवनराव गोरे, हभप सुधाकर इंगळे यांच्या हस्ते लोकार्पण
धाराशिव/तेरणेचा छावा:- श्री विठ्ठल रुक्मिणी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज हभप बापुसाहेब मोरे देहुकर महाराज, हभप बाळासाहेब मोरे पंढरपूरकर महाराज,आ कैलास पाटील, सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, हभप सुधाकर इंगळे महाराज, वत्सला व रामचंद्र खापरे (पती-पत्नी) यांच्या हस्ते तसेच वैष्णव भक्तांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात उत्साहामध्ये मोठ्या थाटात दि.२ मार्च रोजी पार पडला.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धाराशिव तालुक्यातील आळणी शिवारातील ढोकी रोडवरील श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज भक्तीधाम येथे विठ्ठल रुक्मिणी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे संत तुकाराम महाराज यांचे ३७५ वे अमृत महोत्सवी वर्ष आहे. प्रारंभी मंदिर गाभाऱ्यात विठ्ठल रुक्मिणी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मुर्तीची विधिवत पुजा, आरती व अभंगाच्या निनादात पुरुषोत्तम शास्त्री जोशी, ज्ञानेश्वर जोशी, दिनकर ताकभाते व हर्षल जोशी (नारीकर) यांनी पौराहीत्य करीत केले. या सोहळ्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते टाळ, मृदंग व पख्वाजाचा निनाद व संत तुकाराम महाराजांचा जयघोष तसेच प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात करण्यात आले. यावेळी बोलताना आ कैलास पाटील म्हणाले की, संत शिरोमणी तुकाराम महाराजांची शिकवण इतर सर्व धर्मांचा व धर्मियांचा आदर करणारी आहे. मात्र, सध्या महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडील संतांनी धर्मांध कट्टरतावाद आणला आहे. तो कट्टरतावाद सर्वांना मारक व घातक असून तो कट्टरतावाद रोखण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, संत यांच्यासह आपणा सर्वांचीच असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. या माध्यमातूनच संत तुकाराम महाराजांची शिकवण जपणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच या मंदिरासाठी सभा मंडप देण्याची माझी जबाबदारी आहे. तर इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतने या देवस्थानाला पर्यटन स्थळाचा क वर्ग दर्जा मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच आज आपण संत तुकाराम महाराजांची मुर्ती स्थापन करुन मंदिर उभारले हे अतिशय कौतुकास्पद कार्य केले आहे. संत तुकाराम महाराजांनी कर्मकांड व अंधश्रद्धा यावर आयुष्यभर प्रहार ओढून समाजाला जागृत करण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. तर डॉ ओंबासे म्हणाले की, आजच्या काळात सर्वांनी शांततेच्या मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी संतांनी दिलेल्या भागवत धर्माच्या शिकवणीचे सर्वांनी आचारण करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच गोरे म्हणाले की, संत तुकाराम महाराजांची कर्मकांड व अंधश्रद्धा यावर प्रबोधन करुन समाजामध्ये जनजागृती करुन समाज जिवंत ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले. तर छत्रपती शिवाजी महाराजांना लढण्याचे बळ दिले. त्यांच्यासारखे समाजाला दिशा देणारे कार्य आजपर्यंत कोणीही केले नसल्याचे त्यांनी सांगितले. आज नैतिकता ढासळत चालली असून त्याला आळा घालण्याचे काम वारकरी घालू शकते. मात्र काहीजण अंधश्रद्धा पसरवित असून अशा अपप्रवृत्तींना रोखावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हभप बाळासाहेब मोरे देहुकर महाराज म्हणाले की, समाज कल्याणासाठी वारकऱ्यांनी आपले आयुष्य सार्थकी लावावे. तसेच मुलांना वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणे आवश्यक आहे. राजकीय मंडळी व प्रशासकीय अधिकारी यांनी संतांच्या शिकवणीचा अंगीकार केला तर समाज सन्मार्गाने चालल्याशिवाय नाही असे त्यांनी नमूद केले. संतांची परंपरा फार मोठी असून विद्यार्थ्यांना सुसंस्कार, संतांची वचने व अभंग अंगिकारण्यासाठी घडवावे असे आवाहन त्यांनी केले. हभप इंगळे म्हणाले की, मंदिरे खूप बांधली जातात. पण संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारणे हे अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हभप बापुसाहेब मोरे देहुकर महाराज यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच छत्रपती संभाजीराजे भोसले यांना काही कारणास्तव येता आले नाही. मात्र त्यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला. या सोहळ्याचे प्रास्ताविक शशिकांत देशमुख यांनी तर सूत्रसंचालन हभप माऊली तांबे महाराज यांनी तसेच उपस्थितांचे आभार हभप महादेव तांबे महाराज यांनी मानले. या सोहळ्यास धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याची सांगता हभप बाळासाहेब मोरे पंढरपूरकर यांच्या किर्तनाने करण्यात आली. यावेळी उभारीला हात जगी जाणविली मात..देव बैसले सिंहासनी... या अभंगावर चिंतन मांडले. यावेळी धाराशिव माजी नगराध्यक्ष अमित शिंदे,वारकरी साहित्य परिषदेचे धाराशिव तालुकाध्यक्ष मोहन वाघुलकर,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,ह.भ.प. लक्ष्मण महाराज चौगुले,विनोद महाराज वीर,गणपत महाराज येलकर,विनोद महाराज परमार,लक्ष्मण महाराज बोरकडीकर,मन्मथ महाराज उळे,अतुल महाराज कुदळे,सुनिल महाराज पांचाळ हरिभाऊ सांगवे,दादा महाराज सोनटक्के,यांच्यासह जवळा, येडशी, बेंबळी, भडाचीवाडी, हिंगोली, खेड, उळे, बोरगाव (काळे), लातूर, जहागीरदार वाडी, बरमगाव, रुई आदींसह पंचक्रोशीतील भजनी मंडळ उपस्थित होते.
0 Comments