धाराशिव/तेरणेचा छावा :-
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानची बैठक माजीआमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव येथील शासकीय विश्रामगृह येथे शनिवार (दि.1 मार्च) रोजी पार पडली. बैठकीत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांनी केले.
धाराशिव जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे इतर पक्षातील कार्यकर्ते शिवसेना पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश घेत आहेत. त्यामुळे शिवसेना पक्ष अधिक मजबूत होत आहे. याबाबत बैठकीत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करुन शिवसेना पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.
शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्हाप्रमुख दत्ता (आण्णा) साळुंके, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, संघटक सुधीर (अण्णा) पाटील, महिला आघाडी सौ.अर्चना दराडे, जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments