धाराशिव/तेरणेचा छावा: – धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची मागील आठवड्यात सोलापूर येथे महानगर पालिका आयुक्त म्हणून बदली झाली त्यानंतर आठ दिवसापासून जिल्हाधिकारी पदाचा कार्यकाल अप्पर जिल्हाधिकारी अहिरराव यांच्याकडे होता. आज राज्य शासनाने किर्ती किरण एच. पुजार यांची धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. यापूर्वी ते रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यरत होते.
मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, किर्ती किरण एच. पुजार यांनी तत्काळ नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा,असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या सल्ल्यानुसार इतर अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासनातील एक सक्षम आणि अनुभवी अधिकारी म्हणून किर्ती किरण एच. पुजार यांची ओळख आहे. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे आणि प्रशासकीय सुधारणा करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या अनुभवाचा लाभ आता धाराशिव जिल्ह्याच्या प्रशासनाला मिळणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना जिल्ह्याचे पालकमंत्री मिळाल्यानंतर महिनाभरातच नवीन जिल्हाधिकारी मिळाल्याने जिल्ह्यात विकासाची गाडी सुसाट वेग धरणार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
0 Comments