धाराशिव /तेरणेचा छावा:- महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दि. २५ जानेवारी रोजी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्ह्यासाठी ५० नवीन बस देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी २५ बस धाराशिव तुळजापूर व कळंब आगारा दिले आहेत. मंत्री सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळाला असल्यामुळे जिल्हावासियांमधून त्यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. विशेष म्हणजे आश्वासन पाळणारा मंत्री म्हणून त्यांनी आपली छबी निर्माण केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी अच्छे दिन येण्याची आशा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राजकारणामध्ये अनेक आश्वासन दिली जातात. मात्र त्याची पूर्तता होत नसल्याने नागरिक थापाड्या मंत्री म्हणून त्यांची गणना करतात. परंतू सरनाईक यांच्या कथनी आणि करणीमध्ये यतकिंचित देखील फरक नसल्यामुळे नागरिकांना त्यांच्याविषयी आदर, सहानुभूती व जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना विकासाच्या प्रवाहात नक्कीच आणतील अशी आशा निर्माण झाली व होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या खात्या अंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना प्रवासासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पहिल्या दौऱ्यात दिलेला शब्द अवघ्या चौथ्या दिवशीच पूर्ण केला आहे. मंत्री सरनाईक यांनी धाराशिव आगारासाठी १०, तुळजापूर आगारासाठी १० व कळंब आगारासाठी ५ बसेस दिल्या आहेत.
0 Comments