तुळजापूर /प्रतिनिधी: मागील अनेक वर्षांपासून तुळजापूरच्या विकासाला खिळ बसली असून मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मायबाप, एक वेळ संधी द्या तुळजापूरचा विकासातून चेहरा मोहरा बदलेल अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांनी चिवरी येथील प्रचार सभेत दिली.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाल्याने नागरिकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत. तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न,रस्ते, आरोग्य, शिक्षण हे चित्र बदलण्यासाठी आपण आगामी काळामध्ये प्रयत्न करण्यात येणार आहेत. मतदार संघामध्ये तरुणांच्या रोजगाराची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून मतदारसंघांमध्ये एकही मोठी एमआयडीसी निर्माण होऊ शकले नाही हे लोकप्रतिनिधींचे अपयश आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून आजही तालुक्यातील प्रमुख शहरांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत नाहीत,
हिंदवी स्वराज्याची संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना आई तुळजाभवानी मातेने लढण्यासाठी तलवार दिली होती, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक, शिवसृष्टी अद्यापही होऊ शकली नाही ही दुर्दैवाची बाब आहे.
आगामी काळात आपण तुळजापूर मधील शेतकऱ्यांच्या शिवारासाठी शाश्वत पाणी आणि पाणंद रस्ते, प्रत्येक क्लस्टरला महिला बचत गटासाठी सभागृह, जिल्हा परिषद, नगरपालिका शाळा आधुनिकरण करणे, एमआयडीसीच्या माध्यमातून हजारो युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांनी यावेळी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments