Subscribe Us

डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांच्या 'डोअर टू डोअर' प्रचाराला प्रचंड प्रतिसाद; गावोगावी जल्लोषात स्वागत


तुळजापूर/ प्रतिनिधी: तुळजापूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. सोनकाटेताई सोनकाटे यांना जनतेचा अत्यंत उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, गावागावात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी वंचित, बहुजनांची लेक आमदारकीला उभी असून, तिला मतदानरूपी आशीर्वाद देणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या मनामध्ये रुजली आहे. गावातील तरुण, महिला, आबालवृद्ध यांनी डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांना साथ देत यंदा तुळजापुरात प्रस्थापितांची जुलमी राजवट हटविण्यासाठी  परिवर्तन घडविण्याचा संकल्प केला असल्याची भावना जनसामान्य मतदारांमधून व्यक्त होत आहे.
तुळजापूर विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. मतदानासाठी आता अवघे आठदिवस उरल्याने त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांच्यासह त्यांचे हजारो कार्यकर्ते तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन 'डोअर टू डोअर' प्रचार करीत आहेत. मतदार संघातील प्रत्येक मतदारांची गावभेट संवाद दौरा, भेटीगाठी होत असून मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद ही परिवर्तनाची नांदी होणार असल्याचे जनसामान्यांमधून बोलले जात आहे.  
तुळजापूर मधील  लोकप्रतिनिधींनी गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण तालुक्याला विकासापासून वंचित ठेवल्याचे दिसून येत आहे. तालुक्यामध्ये रस्ते, वीज,शैक्षणिक संकुले, इतर मूलभूत पायाभूत सुविधा, आरोग्य विषयक सुविधा यांचा प्रचंड अभाव असून गावोगावीच्या ग्रामस्थांकडून प्रस्थापित लोकप्रतिनिधींच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामस्थांच्या स्वागताने भारावल्या स्नेहाताई:
डॉ.  स्नेहाताई मतदार संघातील प्रत्येक गावांमध्ये भेटी देत असून गावोगावी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये पदयात्रा, पुष्पवृष्टी करत पारंपारिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात येत आहे. चिवरी, केशेवाडी, शिकापूर ,सारोळा , बेंबळी गावांमध्ये ग्रामस्थांनी मिरवणूक काढून घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी करत परिसर दणाणून सोडला. ग्रामस्थांच्या उत्साहपूर्वक स्वागत आणि डॉ. स्नेहाताई अक्षरशः भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. अनेक गावांमध्ये आपलीच लेक निवडणुकीला उभी असल्याचे सांगून ग्रामस्थ आशीर्वाद देताना दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments