तालुक्याचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही ः आमदार पाटील
तेरणेचा छावा/धाराशिव:-, धाराशिव जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या अनेक प्रकल्प आणि योजनांचे काम महायुती सरकारने साकारले आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीला जे जमले नाही, ते महायुतीने करून दाखवले आहे. केवळ तालुक्याचाच नव्हे, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आवश्यक असलेले ऐतिहासिक निर्णय यापूर्वीच महायुतीने सरकारने घेतले आहेत. त्यामुळे आता तालुक्याचा आणि जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विश्वास व्यक्त केला.
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. सिंचनाच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा खोर्याच्या हक्काच्या पाण्याचा निर्णय 23 वर्षांपूर्वी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आपले राजकीय वर्चस्व पणाला लावून मंजूर करून घेतला. महायुती सरकारने त्यासाठी आता 11 हजार 700 कोटी रूपयांची मान्यता दिली आहे. आपल्या जिल्ह्यातील आठही तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे. तुळजाप
0 Comments