तेरणेचा छावा/तुळजापूर:-
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा.श्री अमित ठाकरे यांना या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होऊन त्यांना गुलाल लागू दे यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची महाआरथी शनिवार (दि.16 नोव्हेंबर) रोजी तुळजाभवानी मंदिरात करण्यात आली.
श्री तुळजाभवानीची महाआरती मनविसे राज्यकार्यकरणी सदस्य अभिजित पतंगे तालुकाअध्यक्ष पाशाभाई शेख व आयोजक मनविसे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या हस्ते करून देवी ला साकडं घालण्यात आले
या वेळी उपस्थित मनसे जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव तुळजापूर तालुका उपअध्यक्ष धनाजी साठे निलेश परमेश्वर मनवीसे जिल्हासचिव मानविसे उमेश चव्हाण तुळजापूर तालुकाध्यक्ष सुरज चव्हाण निखिल येडगे सूरज देवकर शुभम रोटे सह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments