Subscribe Us

स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा निर्धार; सामूहिक शपथविधीने दिला सामाजिक संदेश

तेरणेचा छावा/दहिफळ : येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध सांस्कृतिक व देशभक्तिपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांसह उपस्थितांना व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ देण्यात आली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देत विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित नागरिकांनी ‘व्यसनाला दूर ठेवू, व्यसनमुक्त समाज घडवू’ असा निर्धार केला.
या वेळी  जिल्हा उपनिबंधक सहकार विभाग मुंबई  संदिपान बाबासाहेब मते, भाऊसाहेब घेवारे, रामेश्वर मते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान बिभीषण मते, उपाध्यक्ष रामेश्वर सपाटे, बालाजी भातलवंडे, सुजित भातलवंडे, सुरेश कांबळे,बालाजी कदम, निखिल धपाधुळे, दत्ता वाघमारे, बंडू थोरात, चंद्रकांत ढवळे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत कदम, उपाध्यक्षा स्वाती भातलवंडे,खंडू कुटे,भैय्या भुशारी, बापूराव मते,अंजली ढवळे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे मुख्याध्यापक शंकर सावंत, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला.

Post a Comment

0 Comments