Subscribe Us

धाराशिव जिल्हा सहकारी बोर्डाच्या तज्ञ संचालकपदी संतोष बाबासाहेब तौर यांची निवड

जनहित परिवाराच्या कार्याला मिळाली नवी जबाबदारी; जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव

धाराशिव / तेरणेचा छावा : जनहित पतसंस्था, येरमाळा व जनहित परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तसेच कळंब तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रा. संतोष बाबासाहेब तौर यांची धाराशिव जिल्हा सहकारी बोर्डाच्या तज्ञ संचालकपदी मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) निवड करण्यात आली.
सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव, जनहित परिवाराच्या माध्यमातून सुरू असलेले सामाजिक व संस्थात्मक कार्य तसेच सहकार क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जनहित परिवाराच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून, सहकार क्षेत्रातही त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडीच्या वेळी ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ देशमुख, बोर्डाचे अध्यक्ष अभिलाष लोमटे, उपाध्यक्ष अविनाश माळी, जिल्हा सहकार अधिकारी मधुकर जाधव, कळंब पंचायत समितीचे माजी सभापती विकासभाऊ बारकुल, माजी जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल, ऋतुजा राजे, महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष उद्धवराव गपाट यांच्यासह संचालक मंडळातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
प्रा. संतोष तौर यांच्या निवडीबद्दल धाराशिव जिल्ह्यासह कळंब, येरमाळा व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments