तेरणेचा छावा/दहिफळ:-
येथील माजी पोलीस पाटील कै. बिभिषन (अण्णा )पाटील यांच्या पत्नी व माजी उपसरपंच परीक्षीत पाटील यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई पाटील यांचे मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. प्रेमळ व बोलक्या स्वभावामुळे त्यांना परिसरात कांची या नावाने ओळखले जात होते.
सांगली येथे मुलीकडे असताना अचानक अटॅक आल्यामुळे रविवारी दुपारी 5 वाजता दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. यानंतर मंगळवार सकाळी दुसरा नॉर्मल अटॅक आला प्रकृतीने साथ न दिल्यामुळे मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी दुपारी 3 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मित दुःखद निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
0 Comments