Subscribe Us

दहिफळ मलकापूर पाटी रस्त्यावर धावत्या दुचाकीचा भीषण अपघात; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा


तेरणेचा छावा | दहिफळ:-
दहिफळ मलकापूर पाटी रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश संजय शिंदे (रा. बावी, ता. वाशी, जि. धाराशिव) व संजय आण्णासाहेब भातलवंडे (वय 45, रा. दहिफळ, ता. कळंब, जि. धाराशिव) हे दि. 20 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजता एमएच-13-सीएच-9364 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होते. सापनाई गावाकडून महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्नेहा बिअर बारसमोर चालक गणेश शिंदे याने दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन अपघात झाला.
या अपघातात संजय भातलवंडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तर चालक गणेश शिंदे यास किरकोळ दुखापत झाली.
या प्रकरणी आदेश संतोष भातलवंडे (वय 25, रा. दहिफळ, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी 13 जुलै 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments