Subscribe Us

एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त येरमाळा बसस्थानकात वृक्षारोपण


तेरणेचा छावा | येरमाळा :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त येरमाळा एसटी बसस्थानक परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचे उद्घाटन माजी सभापती विकास (भाऊ) बारकुल, कळंब तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक संतोष तौर, पत्रकार नितीन बारकुल, वाहतूक नियंत्रक नागटिळक, अभिजित धाकतोडे आणि नागेश तोडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यक्रमास एसटी कर्मचारी, प्रवासी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षारोपण उपक्रमाचे स्वागत करत पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments