तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीसाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या प्रयत्नांना यश
तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते भूमिपूजन
धाराशिव/तेरणेचा छावा :-धाराशिव शहरातील कपिलधारा येथील शासकीय जमिनीवर तृतीय पंथीयांसाठी स्मशानभूमी देण्यात आली.या स्मशानभूमीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते आज ७ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.अशाप्रकारचा तृतीय पंथीयांसाठी राज्यातील हा पहिला उपक्रम असून तो प्रथमच धाराशिव येथे राबविण्यात आला.
धाराशिव शहराजवळ असलेल्या कपिलधारा स्मशानभूमीलगत समाज कल्याण विभागाची गट नंबर १७ मधील १० आर जागा तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजनेंतर्गत या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामधून स्मशानभूमीची संरक्षण भिंत, बोअर,पाण्याची टाकी,प्रवेशद्वार व इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहे.यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत,नगर पालिकेचे सह उपायुक्त अजित डोके,उपमुख्य अधिकारी पृथ्वीराज पवार,नगर अभियंता वैजिनाथ दुरुगकर, कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी,स्थापत्य अभियंता संदीप दुबे,मनोज कलोरे,कौस्तुभकुमार घडे, श्रावण वैरागे,शबू शेख,नंदनी बनसोडे,मोगरा सय्यद,दीक्षा भगत, रागिनी नलावडे,पूजा कांबळे,रुपा कुऱ्हाडे,प्रीती भगत,साक्षी खोत, देवकी कांबळे,धनश्री सर्वगोड,निशा वाघ,माही सौदागर,कोमल पात्रे, कांची गायकवाड,आरोही गायकवाड, प्रिया चव्हाण या तृतीयपंथीयांसह अन्य तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments