Subscribe Us

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ७ व ८ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिर

     
जिल्ह्यातील सर्व बँकेत शिबिराचे आयोजन
महिलांनी बँक खाते आधार संलग्न करावे

 धाराशिव /तेरणेचा  छावा :- राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असणे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची टक्केवारी ५९.१० टक्के व स्त्रीयांची टक्केवारी २८.७० टक्के इतकी आहे.ही वस्तुस्थिती लक्षात घेता,महिलांच्या आर्थिक,आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याची बाब समोर आल्याने राज्य शासनाने २८ जुन २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरु केली आहे.या योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हयातील सर्व पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज सादर केले आहे.परंतु त्या लाभार्थ्याचे बँक खाते त्यांच्या आधारशी संलग्न केले नसल्यामुळे काही लाभार्थ्याना या योजनेचा लाभ आजपर्यंत महिला लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा झाला नाही.त्या सर्व महिला लाभार्थ्यानी ७ आणि ८ ऑक्टोंबर २०२४ रोजी आपले बँक खाते ज्या बँकेत आहे,त्या बँकेत आपला मोबाईल क्रमांक व आपले मुळ आधारकार्डची छायांकित प्रतीसह स्वत: उपस्थित राहुन बँक खाते आधार संलग्नीकरणाची कार्यवाही पुर्ण करावी.  
            जिल्हयातील सर्व बँकानी या दोन दिवशी मोहिम स्वरुपात शिबीराचे आयोजन करुन बँक खाते आधार संलग्नीकरणाची कार्यवाही पुर्ण करावी.या कामी सर्व अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील महिला लाभार्थ्याना बँकेत जाऊन बँक खात्याशी आधार संलग्नीकरण करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे. पात्र सर्व महिला लाभार्थ्याना या योजनेचा लाभ त्यांच्या बँक खात्यावर जमा होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यानी ज्यांचे आधार सिडींग झाले नाही,त्यांनी वरील नमूद तारखेला बँकेत जाऊन त्वरीत बँक खाते आधार संलग्न करुन घ्यावे.जेणेकरुन संबंधित महिला लाभार्थ्याच्या खात्यावर विनाविलंब योजनेचा लाभ जमा होतील.तरी संबंधित पात्र महिलांनी बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी बँकेत जावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.  
                                     

Post a Comment

0 Comments