धाराशिव/तेरणेचा छावा:-
मागास जिल्ह्याला अजून जास्त मागास करणाऱ्या आणि आपल्या मतदारसंघात निवडून आल्यापासून एकही दर्जेदार विकासकाम न केलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना तसेच उ.बा. ठा. गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना तेरणा शेतकरी सभासद व ऊस उत्पादक शेतकरी मेळावा चांगलाच झोंबलेला दिसतोय. आपण स्वतःही काही करायचं नाही आणि दुसऱ्यांना ही करू द्यायचं अशी मानसिकता असलेले हे लोकप्रतिनिधी आहेत.
हा मेळावा काही साधारण मेळावा नाही तर तो ऐतिहासिक असा मेळावा झाला आहे कारण शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरत, माणसातला देव असणारे प्रा. डॉ. तानाजी सावंत साहेब यांनी इथल्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे तब्बल १२ वर्ष बंद पडलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करून तो पुर्नजीवीत करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे हा मेळावा साधारण मेळावा झाला नसून शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करणारा मेळावा झाला आहे. त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणारा हा तेरणा शेतकरी सभासद व ऊस उत्पादक शेतकरी मेळावा घेण्यात आला.
2019 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळी तानाजीराव सावंत साहेब यांनी पुढाकार घेऊन त्यांनी मा. उद्धव ठाकरे यांना ₹10 कोटी रुपये पक्षनिधी देऊन खासदारकीचं तिकीट ओमराजेनिंबाळकर यांना मिळवून देऊन त्यांना खासदार म्हणून निवडणून आणले. त्यांना खासदार करण्यात तानाजीराव सावंत साहेबांचा सिंहाचा वाटा होता हा इतिहास आहे. सावंत साहेबांच्या आशीर्वादाशिवाय यांचं पान पण हललं नसतं.
राहिला प्रश्न 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा तर त्याबाबतीत सांगायचं झालं तर विद्यमान खासदार सांगत फिरतात की स्वतःच्या जिवावर त्यांनी नुसत्या भूम, परांडा आणि वाशी या विधानसभा मतदारसंघातून 81 हजार एवढे भव्य मताधिक्य मिळवले पण यामागे आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या फॅक्टरचा हात आहे. आमचे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या आशीर्वादामुळेच त्यांना संपूर्ण लोकसभा मतदारसंघातुन भरघोस मताधिक्य मिळाले.
पण टांगा पलटी घोडा फरार असं वागत लोकसभा निवडणूक पार पडताच, मराठा आरक्षण 50% च्या आत देता येत नाही अशी गरळ ओकून आपली अक्कल पाजळणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह उ.बा. ठा. गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एक धसका घेतला की सर्व शेतकरी बांधव आता प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणूनच या शेतकरी सभासद आणि उत्पादक यांची दिशाभूल करण्याचं, त्यांची फसवणूक करण्याचं काम हा भामटा उ.बा. ठा. गट करत आहे.
पाणीदार, मराठा भूषण आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब हे विरोधकांना पुरून उरणारं नेतृत्व आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावं. केवळ त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात नाही तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात साहेबांचं राजकीय वर्चस्व वाढत असल्यामुळे विरोधकांच्या पोटात प्रचंड आगडोंब उसळलेला दिसून येत असल्याचे. सनी पवार शिवसेना शहरप्रमुख धाराशिव यांनी तेरणेचा छावा शी बोलताना सांगितले.
0 Comments