धाराशिव/तेरणेचा छावा:-
श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटला गुरुवार दि. ( १२ सप्टेंबर २०२४) रोजी शिर्डी येथे सहकार गौरव सर्वत्कृष्ट संस्था 2022 23 पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट द्वारे सहकार क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.
भारत सरकारच्या सहकार खात्याचे सचिव मा.श्री.आशीष भुतानी यांच्या हस्ते संस्थेचे चेरमन श्री. दिनेश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री मा.श्री.सुभाषबापु देशमुख, सहकार खात्याचे नाशिकचे विभागीय निबंधक संभाजीराव निकम, महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह क्रेडिट फेडरेशनचे चेअरमन मा.श्री.काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन मा.श्री.सुरेश वाबळे, बुलढाणा अर्बन मल्टिस्टेटचे चेअरमन राधेश्याम चांडक, अहमदनरचे जिल्हा उपनिबंधक श्री.गणेश पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजकुमार जाधव,श्री सिध्दीविनायक जिल्हा पतसंस्थेचे चेअरमन श्री.गणेशजी कामटे,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अरविंद गोरे आदी उपस्थित होते. सिद्धिविनायक मल्टीस्टेटला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याबद्दल सिद्धिविनायक परिवारात आणखी एक मानाचा तुरा रोवल गेला आहे.
सिद्धिविनायक मल्टिस्टेटला सहकार गौरव सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल जनतेतून कौतुक होत आहे.
0 Comments