शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसह पारदर्शक कारभारावर दिला जाणार भर
धाराशिव/तेरणेचा छावा:-- श्री सिध्दीविनायक परिवातील खामसवाडी येथील श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक युनिट क्रमांक
२ गुळ कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४-२५ रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी रविवार दि.१ रोजी सपत्नीक लक्ष्मीपूजन करून रोलर पूजन केले. यावेळी कुटुंबासह खामसवाडी ग्रामस्थ व कळंब तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ३० जून २०२२ रोजी या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. त्यानंतर मागील वर्षी प्रथम चाचणी घेऊन कारखाना सुरू करण्यात आला होता. यावर्षी पूर्ण क्षमतेने गाळप केले जाणार असून प्रतिदिन दीड हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी उपस्थितांना दिली.
कारखाना परिसरातील लोकांच्या मनात श्री सिध्दीविनायक परिवाराबद्दल विश्वास आहे. तो विश्वास सार्थ ठेवण्याचे काम परिवाराकडून केले जाणार आहे. ऊस खरेदी नंतर अवघ्या १५दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातात. नेहमी पारदर्शक व्यवहार केला जाईल असा विश्वास देत मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला अडीच हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना येथे आमंत्रित करून कारखान्याची कार्यपद्धती समजावून सांगण्यात येणार आहे.
यावेळी खामसवाडी चे सरपंच अमोल पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष अजित पिंगळे यांच्यासह विविध मान्यवरांनी सिध्दीविनायकपरिवाराबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत तात्या मडके, बालाजी कोरे, खामसवाडी उपसरपंच किरण पाटील, सोसायटी चेअरमन संजय पाटील, तेरणा कारखान्याचे माजी संचालक दिलीप पाटील, अरुण चौधरी, माणिक बोंदर, सचिन मिनियार, गणेश कामटे, दिनेश कुलकर्णी, राजकुमार जाधव, अरविंद गोरे तसेच कारखान्यातील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ॲड.नितीन भोसले यांनी केले.
0 Comments