धाराशिव/तेरणेचा छावा:-
कळंब धाराशिव विधानसभा संपर्कप्रमुख श्री नितीन लांडगे यांच्या वतीने गेल्या ७ वर्षापासून प्रती वर्षी साजरा केला जाणारा हिंदू मुस्लिम एकता रक्षाबंधन सोहळा याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी पाचशे हिंदू मुस्लिम भगिनी, पोलीस भगिनी उपस्थित होत्या त्याच बरोबर हिंदू मुस्लिम पुरूषांचीही संख्या लक्षणीय होती आणि तसेच या एकोप्याच्या आनंदी सोहळ्यात चिमुकले सुद्धा लक्षणीय होते. या सोहळ्यात नितीन लांडगे यांच्या वतीने उपस्थित. भगिनिंसाठी साड्यांचे आणि चिमुकल्यांना शैक्षिणक किट भेट म्हणून देण्यात आले. या सोहळ्यासाठी विशेष मेहनत शकील भाई काजी यांनी घेतली आणि उपस्थिती नितीन लांडगे, गणेश जगताप, निखिल घोडके, भारती गायकवाड, नितीन पाटील, अमर गायकवाड, सुधीर भवर सर, मंदार मुळीक, गजानन चोंदे, शंकर वाघमारे, आबा मुंढे, सचिन सौलखे, महेश कोळपे, सुमित बोरगे, प्रमोद करवलकर, बप्पा चोंदे, सोमनाथ वावरे, विशाल जाधव, नितीन जावळे, करण घुले, इत्यादी उपस्थित होते.
0 Comments