मुख्यमंत्र्यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा!
तेरणेचा छावा चे वृत्त खरे ठरले!
धाराशिव/तेरणेचा छावा:-
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत शिवसेना पक्षात प्रवेश केला.
सुधीर अण्णा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे अनेकांची गणिते बिघडणार असल्याचे संकेत यातून दिसून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रवेशामागे एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा जिल्हाभरातून ऐकावयास येत आहे.
तेरणेचा छावा मध्ये धाराशिव जिल्ह्यातील बडा नेता करणार शिवसेनेत प्रवेश अशा आशयाची बातमी टाकल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती हे असले तरी आणखी एक दोन नेते प्रवेश करण्यास असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे!
२०१७ मध्ये शिवसेना पक्षातून त्यांनी काही लोकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजपात प्रवेश केला होता.आता परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर निष्ठा व विश्वास ठेवत ते शिवसेनेत दाखल झाले आहेत.
येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला असल्याचे बोलले जाते. या सुधीर अण्णा पाटील यांनी 1990 धाराशिव तर 2014 तुळजापूर विधानसभेची निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवली होती.
शिवसैनिक म्हणून धाराशिव जिल्ह्यात मी राजकीय कार्याला सुरुवात केली. त्यानंतर, माझ्या कामाची पद्धत आणि शिवसैनिकांमधला गुण रक्तातच असल्याने शिवसेनेत मला उपजिल्हाप्रमुख म्हणून ३ वर्षे काम करण्याची संधी मिळाली. तर ६ वर्षे धाराशिव जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या काळात शेतकरी, व सर्वसामान्यांसाठी अनेक आंदोलने केली. शिवसेनेच्या शाखा गावखेड्यात वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यामुळे, आज पुन्हा शिवसेनेत परत येत असताना आपल्या जुन्या घरी आल्याची जाणीव होतेय. असे त्यांनी तेरणेचा छावा शी बोलताना सांगितले.
0 Comments