Subscribe Us

धाराशिव जिल्हा नियोजन समिती पत्रकारांना प्रवेश नाकारला!


(संग्रहित फोटो)
धाराशिव/तेरणेचा छावा :-
          धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी पालकमंत्री,खासदार,आमदार प्रवेश करत असताना असताना पोलीस प्रशासनाने पत्रकारांना प्रवेश  नाकारला परंतु यावेळी अनेक कार्यकर्त्यांनाही प्रवेश दिल्याचे दिसून येत होते. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना प्रवेश देत असताना पत्रकारांना प्रवेश नाकारने योग्य आहे का? जिल्हा नियोजन समितीत नेमकी कामे जनतेची असतात की पुढार्‍याची!
    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधकांचा आणि सत्ताधाऱ्यांचं साटलोट आहे की काय असा प्रश्न जनतेतून ऐकावयास येत आहे. कारण तू मारल्या सारखं कर मी रडल्यासारखे करतो अशा प्रकारे कामकाज चालत असल्याचे  जनतेतून एकावयास येत आहे..
    ही जिल्हा नियोजन समितीची बैठक शेवटची असून यानंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आचारसंहितेच्या आधी सर्व कामाचा निधी संगणमताने वाटून घेतल्याचे बाहेर जाऊ नये म्हणून हा आटापिटा केल्याचे बोलले जात आहे?
मोदी सरकार व शिंदे सरकार पारदर्शकपणे काम करत असल्याचे जनतेला सांगत असताना नेमकं  धाराशिव जिल्ह्यातील नियोजन बैठकीसाठी पत्रकारांना प्रवेश नाकारून नेमकं साधायचय तरी काय? प्रश्न सुज्ञ जनतेतून एकावयात येत आहे.

Post a Comment

0 Comments