Subscribe Us

वादळामुळे येरमाळा गावात व्यवसायिकाचे लाखोचे नुकसान

येरमाळा/तेरणेचा छावा;-.  शनिवारी (ता.२५) रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने येरमाळा गावतील घरांचे, हॉटेल व्यवसायीकांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले.आज पर्यंत असे वादळी वाऱ्याने पहिल्यांदाच नुकसान झाल्याने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामस्थ, व्यवसायिकांनी मागणी केली होती.रविवारी (ता.२६) रोजी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधी समक्ष महसूल विभागाने पंचनामे केले.
शनिवारी साडेपाच वाजता अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने गावतील घरांचे,हॉटेल,कुकूट पालन,व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान झाले.या वादळी वाऱ्यामुळे झाले नुकसानीचे व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
त्यामुळे रविवारी सकाळी आमदार राणाजगजितसिंह पाटील आमदार कैलास पाटील यांनी वादळा मुळे पत्रे उडून गेलेल्या सुनील विठ्ठल बारकूल, कुलदीप पवार यांचे शेडवरील ७० पत्रे तर सतीश पवार यांचे ४० पत्रे उडाल्याने कोंबड्या दगावल्याने कुकूट पालनाचे नुकसान झाले आहे,तर महिनाभरा पूर्वीच उभरालेल्या राजाभाऊ टेकाळे यांचे हॉटेल प्रतिकचे वादळाने उडालेल्या शेडची पाहणी केली.दरम्यान महसून विभागाचे मंडळ अधिकारी,नितीन मंडाळे, तलाठी साधना गायकवाड, ग्रामसेवक आर.ई.हांडे,कोतवाल संजीव पवार,कर्मचारी यांनी पंचनामे केले.
येडेश्वरी मंदिरावरील भाविकांच्या निवाऱ्यासाठी उभारण्यात आलेल्या खाजगी अनिल बारकूल पत्राच्या शिवनेरी हॉल्स,तर गणेश पवार यांच्या छत्रपती हॉल्सचे प्रत्येकी २५ ते ३० गाळ्याचे पत्रे उडून नुकसान झाले आहे.
गावतील अनेकांचे घरावरील, पत्रे,सोलर पॅनल,जनावरांचे गोठयाचे नुकसान झाले आहे.एकही नुकसान ग्रस्त ग्रामस्थ राहू नये अशी पाहणी करुन पंचनामे करावेत अशा सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील यांनी यावेळी महसूल विभागाच्या अधीकाऱ्यांना दिल्या आहेत.
   त्यानंतर दुपारी 04 :00 वाजता कळंबचे तहसीलदार विजय अवधाने,यांनी तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागाना भेटी दौऱ्यावर दरम्यान येमाळ्यातील नुकसानीची पाहणी केली.

 वदळात झालेल्या लहाणात लहान ते मोठया नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करू नुकसान ग्रस्तानी नुकसानीची माहिती व पंचनामा तलाठी कार्यालया प्राप्त झाल्याचे   तहसीलदार विजय अवधाने यांनी तेरणेचा छावा शी बोलताना सांगितले.. 

श्री येडेश्वरी मंदिर रोड लगत असलेली,गावातील झाडे, पशुवैद्यकीय दवाखानातील झाडे,विद्युत पुरवठा लाईनवर पडल्याने गावतील विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास बावीस तास गेले रविवारी दुपारी तीन वाजता विद्युत पुरवठा सुरळीत झाला.त्याlमुळे  रात्रीपासून बहुसंख्य लोक नोट रिचेबल होते.

Post a Comment

0 Comments